घोटाळेबाजांचा हिशोब चुकता करण्यासाठी येतोय आर माधवनचा 'हिसाब बराबर'

R Madhvan: डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
R Madhavan new movie
घोटाळेबाजांचा हिशोब चुकता करण्यासाठी येतोय आर माधवनचा 'हिसाब बराबर' file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर माधवन चित्रपटसृष्टीतील एक व्हर्साटाईल अॅक्टर म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आर माधवनचा त्याचा असा एक चाहतावर्ग आहे. आता तो त्याचा चाहत्यांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत आहे.

आर माधवनचा आगामी चित्रपट 'हिसाब बराबर' जानेवारी २०२५ मध्ये रिलीज होत आहे. त्याचा हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

घोटाळेबाजांचा सर्वनाश करण्यासाठी येतोय आर माधवन

अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटात एका भयानक तांत्रिकाची भूमिका आर माधवन याने साकारली होती. यानंतर तो आता घोटाळेबाजांचा नाश करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी 'हिसाब बराबर' चित्रपटात राधे मोहन शर्मा या प्रामाणिक रेल्वे टीटीईची भूमिका साकारताना आर माधवन दिसणार आहे. अश्वनी धीर दिग्दर्शित हा चित्रपट जानेवारी २०२५ मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार असून फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याची शपथ घेत असलेला एक प्रामाणिक रेल्वे अधिकारी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Pudhari

'या' भाषेत पाहायला मिळेल 'हिसाब बराबर'

आर माधवनचा हा चित्रपट २४ जानेवारी २०२५ रोजी डिजिटल पद्धतीने प्रदर्शित होणार आहे. हे ZEE5 वर हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. अलीकडेच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने चित्रपटाच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली असून ट्रेलर ट्विटरवर एका कॅप्शनसह शेअर केला आहे. यामध्ये लिहिले आहे की "व्यवस्था हादरणार आहे, घोटाळेबाज घाबरणार आहेत! आता सामान्य माणूसच हिशेब चुकता करेल."

चित्रपटाचे कथानक काय ?

चित्रपटाची कथा आर माधवनने साकारलेल्या राधे मोहन शर्माभोवती फिरते. तो एक प्रामाणिक रेल्वे तिकीट तपासनीस आहे ज्याला त्याच्या बँक खात्यात एक किरकोळ तफावत आढळते. या छोट्याशा चुकीमुळे त्याला नील नितीन मुकेशने साकारलेल्या मिकी मेहता नावाच्या भ्रष्ट बँकरने रचलेला एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्यास मदत होते.

'हिसाब बराबर' मध्ये 'हे' कलाकार साकारणार भूमिका

या चित्रपटात आर माधवन, नील नितीन मुकेश, रश्मी देसाई, कीर्ती कुल्हारी, इमरान हसनी, इश्तियाक खान, सचिन विद्रोही आणि महेंद्र राजपूत यांच्या भूमिका आहेत. जिओ स्टुडिओ आणि एसपी सिनेकॉर्पच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे यांनी याची निर्मिती केली आहे.आता हा चित्रपट काय कमाल करणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news