

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'पुष्पा २ : द रूल'च्या रिलीजचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. यामध्ये अल्लू अर्जुन 'पुष्प राज' बनून कमबॅक करेल. सुकुमार दिग्दर्शित चित्रपट ५ डिसेंबर, २०२४ रोजी जगभरात मोठ्या पडद्यावर रिलीज होईल. आणि ४ डिसेंबर, २०२४ ला ग्लोबली स्पेशल प्रीमियर होईल. याआधी 'पुष्पा-२' टीम ॲक्शनने भरपूर एंटरटेनरसाठी लहा शहरांचा दौरा करणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन-रश्मिका मंदाना आणि चित्रपटाची टीम नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या ६ शहरांचे मोठे दौरे करण्यासाठी तयार आहे. अल्लू अर्जुन १५ नोव्हेंबर पासून पटना, कोच्ची, चेन्नई, बंगळुरु, मुंबई आणि हैदराबादचा दौरा करणार आहे. 'या' ६ शहरांचा दौरा १५ नोव्हेंबरच्या आसपास एक मेगा ट्रेलर लॉन्च इव्हेंटसोबत सुरू होईल. आता रिपोर्टनुसार ट्रेलर सोहळा पटनामध्ये होईल.
'बाहुबली-२' नंतर पुष्पा-२ च्या भारतीय सिनेमाचे सर्वात चर्चित सीक्वल आहे. आणि कमाईमध्ये देखील रेकॉर्ड तोडेल. फॅन्स 'या' चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी तयार आहे. आधी पुष्पा ६ डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात धमाका करण्यासाठी तयार आहे.