प्रतीक्षा संपली, अल्लू अर्जुनच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Pushpa 2 : The Rule New Poster | अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'चे नवे पोस्टर जारी
Pushpa 2 : The Rule New Poster
पुष्पा २ चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेx account
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - २०२४ चा बहुप्रतीक्षित चित्रपट पुष्पा २ : द रूल चे काऊंटडाऊन सुरू होताच निर्मात्यांनी अल्लू अर्जुनचा एक जबरदस्त नवं पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये सुपरस्टार अल्लू आत्मविश्वासाने एका खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्याचा यामध्ये अनोखा स्वॅग दिसत आहे. आता थिएट्रिकल रिलीजसाठी फक्त ५० दिवस बाकी आहेत. ६ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

पुष्पा 2 : द रूलचे नवे पोस्टर रिलीज

ब्लॉकबस्टर पुष्पा : द राईजचे सीक्वल पुष्पा २ द रुल आहे. ॲक्शन आणि ड्रामाने भरलेले हे पोस्टर माइथ्री मुव्ही मेकर्सने सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ''प्रतीक्षेची वेळ कमी होत आहे'' पुष्पा राज आणि ब्लॉकबस्टर रूल पाहण्यासाठी ५० दिवस शिल्लक आहेत.”

रिपोर्टनुसार, पुष्पा २ : द रूल पुष्पा राजचा इंटरेस्टिंग प्रवास यात दाखवण्यात येणार आहे. तो स्मगलिंगच्या दुनियेत प्रवेश करत असताना हा प्रवास असेल. अल्लू अर्जुनची यावेळची कहाणी सविस्तर असेल. चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल देखील आहेत.

Pushpa 2 : The Rule New Poster
Femina Miss India 2024 : मिस इंडियाचा किताब मिळवणारी कोण आहे निकिता पोरवाल?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news