

पुढारी ऑनलाईन डेस्क - अल्लू अर्जुनचा पुष्पा २ आणि विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चर्चेत आहे. पुष्पा-२ च्या ट्रेलरमुळे सध्या अल्लू-अर्जुनची सगळीकडे चर्चा आहे. पण चर्चा होती ती बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी हे दोन चित्रपट रिलीज होणार होते. पण आता रिपोर्टनुसार, मोठा बदल पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित 'पुष्पा २ : द रूल' आता संपूर्ण भारतात सोलो रिलीजचा आनंद घेता येणार आहे. कारण, विक्की कौशलचा 'छावा' ८ डिसेंबर रोजी रिलीज टाळण्यात आली आहे.
सूत्रांनुसार, छावाची नवी रिलीजची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. पण, निर्माते दिनेश विजन आणि दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर दोन रिलीज तारखांवर विचार करत आहेत. निर्माते २० डिसेंबर आणि १० जानेवारीवर विचार करत असल्याचे समजते. आतादेखील ते मुल्यांकन करत आहेत की, कोणती तारीख सर्वात उपयुक्त आहे आणि पुढील१० दिवसांच्या आत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
जर छावा २० डिसेंबरला रिलीज झाला तर चित्रपटगृहात हॉलीवूडचा मुफासा: द लायन किंग चित्रपटाशी प्रतिस्पर्धा करावा लागू शकतो. कारण २०१९ रोजी रिलीज झालेला चित्रपट फिल्म द लॉयन किंगने भारतात १८८ कोटींची कमाई केली होती.
शिवाय, वरुण धवनचा ॲक्शन एंटरटेनर बेबी जॉन २५ डिसेंबर रोजी रिलीज होईल.नंतर राम चरण आणि एस शंकर यांचा गेम चेंजर रिलीज होईल. छावा चित्रपटात विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, डायना पेंटी, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यादोखील प्रमुख भूमिका आहेत. ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.