Pushpa 2 Box Office Collection Day 1 : 'फायर नहीं, वाइल्ड फायर'... 'पुष्पा 2'ने पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाई!

बाहुबली आणि RRR चित्रपटांचे रेकॉर्ड धुळीस
Pushpa 2 Box Office Collection Day 1
पुष्पा 2'ने पहिल्याच दिवशी केली छप्परफाड कमाईPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका दिवसापूर्वीपर्यंत सर्व चित्रपट निर्मात्यांना भीती होती की, आपल्या चित्रपटाचा विक्रम मोडला जाऊ शकतो. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात या म्हणीप्रमाणे अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2'ने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यांने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटांच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर मात करत, पहिल्या दिवशी सर्वात जास्त पैशांचा गल्ला कमावण्याचा विक्रम 'पुष्पा 2'च्या नावावर झाला आहे. 'लाइव्ह ट्रॅकर सकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतातून 175.1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये बुधवारी (डिसेंबर 4) रात्री आयोजित केलेल्या सशुल्क पूर्वावलोकनाचाही समावेश आहे. त्याचबरोबर 'जवान'लाही पुष्पा 'राज'पुढे गुडघे टेकावे लागले आहेत.

'पुष्पा 2' ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

नुकताच 'SACNILC' चा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 175.1 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवसाच्या या संग्रहामध्ये सशुल्क पूर्वावलोकन देखील समाविष्ट आहे. वास्तविक, चित्राने तेलुगू भाषेत केलेल्या सशुल्क पूर्वावलोकनातून 10.1 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला या चित्रपटाने एकूण 175 कोटींची कमाई केली आहे.'पुष्पा 2' ने पहिल्या दिवशी 85 कोटींची कमाई करत तेलगू भाषेतून सर्वाधिक कमाई केली आहे. पण त्यात 4 डिसेंबरचा सशुल्क पूर्वावलोकन जोडला तर एकूण 95.1 कोटी रुपये होतात. हिंदीतून 67 कोटींची कमाई करणारा हा हिंदी सिनेमातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. याशिवाय तामिळमधून 7 कोटी रुपये, कन्नडमधून 1 कोटी रुपये आणि मल्याळममधून 5 कोटी रुपये कमावले आहेत. ही आकडेवारी 6 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंतची आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 1
बॉक्स ऑफिस : भुलभुलैय्या 3 ची धडक सुरूच ; जमवले इतके कोटी

भाषानिहाय चित्रपटाने केलेली कमाई

  • तेलुगु 85 करोड़ रुपये

  • हिंदी 67 करोड़ रुपये

  • तमिल 7 करोड़ रुपये

  • कन्नड़ 1 करोड़ रुपये

  • मलयालम 5 करोड़ रुपये

  • पेड प्रीव्यू (तेलुगु) 10.1 करोड़ रुपये

'जवान'ला चारली धूळ चावला; बनला सर्वात मोठा हिंदी चित्रपट

'पुष्पा 2' ने शाहरुख खानच्या 'जवान'ला उखडून टाकले. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा हिंदी सिनेमातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. 'पुष्पा 2' ने पहिल्याच दिवशी हिंदीत 67 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शाहरुख खानच्या 'जवान'ने पहिल्याच दिवशी हिंदीत 65.5 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या क्रमांकावर पठाण 55 कोटी आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर रणबीर कपूरचा ॲनिमल आहे, ज्याने पहिल्या दिवशी हिंदीमध्ये 54.75 कोटींची कमाई केली होती.

Pushpa 2 Box Office Collection Day 1
अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक

RRR- बाहुबली 2 ने 'पुष्पा 2'पुढे गुडघे टेकले!

'पुष्पा 2' ने राजामौलीच्या 'बाहुबली 2' आणि RRR या दोन्ही मोठ्या चित्रपटांना पहिल्याच दिवशी पराभूत केले आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 175 कोटी रुपये आहे. तर, RRR ने पहिल्या दिवशी भारतातून 133 कोटींची कमाई केली होती. तर 'बाहुबली 2'चे भारतातील निव्वळ कलेक्शन 121 कोटी रुपये होते. तर यशच्या 'केजीएफ 2' ने 116 कोटींचा व्यवसाय केला. मात्र, यावेळी सर्वजण जगभरातील कलेक्शनची वाट पाहत असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news