Punha Shivajiraje Bhosale | 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित, या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Mahesh Manjrekar Punha Shivajiraje Bhosale | विठ्ठ्ल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली
image of Punha Shivajiraje Bhosale movie
Mahesh Manjrekar movie Punha Shivajiraje Bhosale release dateInstagram
Published on
Updated on

Mahesh Manjrekar movie Punha Shivajiraje Bhosale release date

मुंबई - अभिनेते महेश मांजरेकर यांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेत ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या भव्य चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारत असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रभावी टीझरमध्ये त्यांच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसर देखील झळकली आहे.

image of Punha Shivajiraje Bhosale movie poster
Instagram
image of Punha Shivajiraje Bhosale movie
RJ Mahvash-Yuzvendra Chahal | 'संपूर्ण भारताला माहिती झालंय', 'सीक्रेट गर्लफ्रेंड' विषयी अखेर बोलला यजुवेंद्र चहल; कोण आहे 'ती'?

टीझरमध्ये ऐकू येणारे 'राजं… राजं' हे बोल ज्या ऊर्जेने, ज्या भावनांनी भरलेले आहेत, ते थेट काळजाला भिडतात. सिद्धार्थ बोडकेच्या संवादांमधून केवळ इतिहासाची आठवण होत नाही, तर मनात नवी उमेद, ऊर्जा आणि प्रेरणा संचारते. शिवरायांच्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यागमय नेतृत्वाचं दर्शन घडवणाऱ्या या टीझरमधील दृश्यं आणि संवाद हे अंगावर शहारे आणणारे आहेत.

image of Punha Shivajiraje Bhosale movie
Vijay Deverakonda Kingdom | ॲक्शन ड्रामा 'किंगडम' रिलीज डेट प्रोमो आज होणार जाहीर; विजय देवेराकोंडाचा लूक पाहाच!

हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली आहे.

याविषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात: “शिवाजी महाराज ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून ते एक विचार आहेत. हा विचार आज अधिक आवश्यक आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट म्हणजे इतिहासाकडे मागे वळून पाहाणं नाही, तर शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात आजचा अंधार उजळवण्याचा प्रयत्न आहे. समाजात निर्माण झालेल्या निराशा, उदासीनता, आणि दिशाहीनतेच्या गर्तेत आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या मूल्यांकडे वळणं गरजेचं आहे. हा सिनेमा त्या जाणिवेचा आवाज आहे.’’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news