Punha Kartavya Ahe | आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात

'पुन्हा कर्तव्य आहे' | आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात
Punha Kartavya Ahe tv show
'पुन्हा कर्तव्य आहे' | आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यातInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'पुन्हा कर्तव्य आहे' सध्या खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. एका बाजूला वसुंधराचे पाय पकडून विशाखा मदतीसाठी विनंती करतेय. वसुंधराची एक अट आहे की, विशाखाने एक कोऱ्या कागदावर सही करावी. सही केल्यावर वसुंधरा त्या कागदावर लिहिते की, तनयाला घरातील सगळे काम एकटीने करावी लागतील. तनया सगळी घरकामं एकटीनेच करतेय, ज्यामुळे ती विशाखावर चिडू लागलेय.

या सगळ्यात तनया अचानक बेशुद्ध पडते, यात ती गरोदर असल्याचं निदान होतं. हे ऐकून घरातील सगळे आनंदित आहेत. पण तनया खरचं गरोदर आहे? तनया तिच्या गरोदरपणाचा फायदा घेत इतरांना घरची कामं पूर्ण करायला लावते. ती स्वतःची खोली बदलून मोठी खोली मागते, ज्यामुळे वसुंधरा, आकाश आणि त्यांच्या मुलांना लहान खोलीत जावं लागतं. एवढं असूनही वसुंधरा आणि तिचं कुटुंब आनंदी आहे. ज्यामुळे तनयाला अजूनच चिड येते.

दरम्यान, वसुंधराला कळतं की विशाखाला कोणीतरी व्यक्ती ब्लॅकमेल करतेय. ब्लॅकमेल करणारा तोच व्यक्ती आहे, ज्याने यापूर्वी आकाशवर गोळी झाडली होती. आकाश ठरवतो की, वसुंधरा आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी ते सगळे एकत्र सहलीला जातील. सहलीची तयारी करत असताना, वसुंधराला काही धागेदोरे मिळतात, ज्यामुळे तिला वाटतं की, तनया, विशाखा आणि अखिल तिच्या आणि आकाशविरोधात कट करत आहेत. वसुंधराला संशय येतो की तनया आणि विशाखाच्या लकी सोबत काहीतरी प्लॅन करतायत. विशाखा ने आकाश आणि वसुंधरा संपवण्याचा निर्धार केला आहे.

काय आहे विशाखाचा प्लॅन? तनया खरच गरोदर आहे? खरंच आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात असेल? यासाठी 'पुन्हा कर्तव्य आहे' सोम- शनि संध्या. ६ वा. झी मराठीवर पाहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news