Punha Kartavya Aahe | हनिमूनच्या निमित्ताने आकाश देणार वसूला एक खास सरप्राईझ !

'पुन्हा कर्तव्य आहे' : जयश्रीचे वारस मिळण्याचं स्वप्न पूर्ण होणार का?
Punha Kartavya Aahe TV Serial
'पुन्हा कर्तव्य आहे'मध्ये नवं ट्विस्ट पाहायला मिळत आहे Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसू आणि बनीच्या नात्यात दुरावा दर क्षणी वाढत चालला आहे. वसुला दुःखी पाहून आकाश तिच्यासाठी काही तरी खास करायचं म्हणून घरात पाणीपुरी पार्टीचे आयोजन करतो. पण वसुला बनीसोबतच्या तिच्या पाणीपुरीच्या आठवणी आठवतात. ही पाणीपुरी पार्टी घरात चालू असतानाच जयश्री बनीला फोन करून त्याच्या मनात गैरसमज निर्माण करते की, त्याच्या अनुपस्थितीत घरात सगळे पार्टीचा आनंद घेत आहेत. जयश्री फोनवर बोलत असताना वसु त्यांना पकडते. वसू बनीला कॉल करून वचन देते की ती दुसऱ्या दिवशी त्याला भेटेल. बनी वसूला भेटण्यास उत्सुक असताना जयश्री काहीतरी कारस्थान करून वसूला थांबवते. बनी वसूची वाट पाहत राहतो आणि ती न आल्याने खूप दुःखी होतो.

बनी एका मित्राच्या मदतीने रात्रीच्या वेळी वॉर्डनपासून लपून त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट करतो. इकडे घरी जयश्री वसूवर ठाकूरांच्या वारसासाठी दबाव टाकतेय. दुसऱ्या दिवशी आकाश घोषणा करतो की, तो वसूला घेऊन हनिमूनला जात आहे, हे ऐकून वसूला धक्का बसतो. या हनीमूनच्या निमित्ताने आकाशकडून वसुला काय खास सरप्राईझ मिळणार? हॉस्टेलमध्ये बनी आईच्या वाढदिवसासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवतो आहे, पण हे ग्रीटिंग कार्ड वसुपर्यंत पोहोचेल? बनी वसूची भेट होऊ शकेल का? जयश्रीचे वारस मिळण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? या सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' चा महाएपिसोड १८ ऑगस्ट रात्री ९:३० वाजता झी मराठीवर पाहता येईल.

Punha Kartavya Aahe TV Serial
70th National Film Awards : ‘या’ 3 मराठी माहितीपटांची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मोहोर!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news