Abha Ranta : ‘हिरामंडी’ च्या नव्या अभिनेत्रीची चर्चा; ‘लापता लेडीज’ फेम आभा रांटा आहे तरी कोण?

Abha Ranta
Abha Ranta

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'हिरामंडी: द डायमंड बझार' आणि 'लापता लेडीज' या गाजलेल्या वेबसीरीजमधून बॉलिवूड अभिनेत्री प्रतिभा रांटा चर्चेत आली आहे. 'हिरामंडी' मधील अभिनयाच्या कौशल्याने तिने चाहत्यांना भारावून सोडलं आहे. प्रतिभासोबत तिची लहान बहिण आभा रांटा ही काही कमी नाही. ती या वेबसीरीज दिसली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आभाला 'हिरामंडी'मध्ये कास्ट केलं होतं. यामुळे जाणून घेवूयाच खास तिच्याविषयी…

आभा रांटा हिच्याविषयी जाणून घेवूयात

  • 'हिरामंडी: द डायमंड बझार' मध्ये तरूण 'मल्लिकाजान'ची भूमिका साकारली.
  • आभा रांटा ही प्रतिभा रांटाची बहिण आहे.
  • आभा रांटा सोशल मीडियावर सक्रिय आहे.
  • दमदार अभिनयामुळे आभाची चर्चा हहोत आहे.

आभा रांटाने 'हिरामंडी' मध्ये तरूण 'मल्लिकाजान'ची साकारली भूमिका

अभिनेत्री प्रतिभा रांटाची बहिण आभा रांटा हिने 'हिरामंडी' वेबसीरीजमध्ये भारदस्त तरुण 'मल्लिकाजन' ची भूमिका साकारली आहे. यानंतर या वेबसीरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला ही दिसली. वेबसीरीजच्या सुरूवातीला आभाचे अभिनय कौशल्य आणि संवाद अगदी अचूकपणे मांडले गेले आहेत. हे दुष्य काही सेकंदाचे आहे मात्र, सर्वांची मने पिळवटून टाकणारे आहे. या वेबसीरीजमध्ये नवजात बाळाला चांगल्या आयुष्यासाठी वेश्या व्यवसायाला विकले जाते हे दाखविले आहे. आभाने यंग 'मल्लिकाजन' ची तर प्रतिभाने 'हिरामंडी'मध्ये 'शमा'ची भूमिका साकारली आहे. जी 'वहीदा' म्हणजेच संजीदा शेख यांची मुलगी आहे.

कोण आहे आभा रांटा?

सध्या आभा रांटाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सोशल मीडियावर १२ लाख ६ हजार फॅन फॉलोव्हर्स आहेत. याशिवाय ती तिचे युट्यूब चॅनेलदेखील चालवते. युट्यूबवर आभाचे भंटकंती करतानाचे खूपच व्हिडिओ आहेत. यावरून आभाला फिरण्याची आवड असल्याचे दिसते.

आभाने तिच्या इंस्टाग्रामवर 'हिरामंडी' वेबसीरीजमधील लूकचे काही फोटो शेअर केलं आहेत. यात ती गुलाल कलरचा लेंहगा – चोळीसोबत त्याच रंगाची ओढणी परिधान केली आहे. या ड्रेसवर गोल्डन फ्लोरल वर्क आहे.

'हिरामंडी'मधील लूकची चर्चा

कुरळे केस, नाकाची मोठी रिग्स, कानात झुमके, गळ्यात भरजरी नेकलेस, हॅड ज्वेलरी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. यासोबत तिने तिच्या हातात गुलाबाचे फुल दिसत आहे. यालूकमध्ये आभा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटो शेअर करताना आभाने लिहिलंय की, 'हिरामंडी'मधील तिच्या भूमिकेसाठी मिळणाऱ्या प्रेमाने आणि कौतुकाने मी भारावून गेले आहे.

यानंतर सोशल मीडियावर तिच्या लूकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना काँमेन्टसचा पाऊस पाडलाय. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत. या फोटोला ६ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा

 

View this post on Instagram

 

A post shared by Abha Ranta (@abharanta_)

 

View this post on Instagram

 

A post shared by Abha Ranta (@abharanta_)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news