Next Cinema | रहस्य, थरारक मेगा चित्रपट 'कर्माण्य' पुढच्या वर्षी सिनेमागृहात

रहस्य आणि रोमांचक सिनेमा "कर्माण्य" मोशन पोस्टर रिलीज
Cinema release Next year
कर्माण्य चित्रपटात नवा चेहरा पाहायला मिळणार Youtube
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रहस्य आणि रोमांचकने भरलेल्या कर्मण्य चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरच्या पार्श्वभूमीत पाहता तर काही आदिवासी संगीतासह जंगली प्राणी आणि उडत्या गरुडांचे दृश्य पाहायला मिळेल. तसेच पार्श्वभूमीत एका भव्य मंदिर पाहायला मिळेल जिथे प्रतीकची एन्ट्री होताना दिसेल. ह्या एन्ट्रीने सर्वांनाच चकित केले आहे. ५१ सेकंदांच्या ह्या टीजरमध्ये अनेक मोठे हॉलिवूड तंत्रज्ञ आणि कंपन्या संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

ह्या चित्रपटाचा टीजर खूपच प्रभावी असल्याने, प्रेक्षाकाना देखील सिनेमा पाहायची घाई आहे. हा असा पहिला इंडो-अमेरिकन चित्रपट आहे जो भव्य पद्धतीने चित्रित केला जाणार आहे. चित्रपटात व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्सचा वापर करून भव्यता दर्शविण्यात आली आहे. व्हिज्युअल्स अशा रीतीने प्रेजेंट करण्यात आले आहेत की, ही कथा जंगलात खोलवर दडलेल्या गुप्त शोधावर आधारित आहे किंवा ती भारतीय लोककथा आहे किंवा एखाद्या महान राजपुत्राची कथा आहे.

या चित्रपटातून प्रतीक जैन सिनेविश्वात पदार्पण करणार आहे. नवीन चेहऱ्याचा शोध अनेक शहरांमध्ये करण्यात आला होता. बऱ्याच कलाकारांच्या ऑडिशननंतर, प्रतीक जैन यांना या चित्रपटासाठी फायनल करण्यात आले. राप्रा आणि बीएस फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण होत असलेला "कर्माण्य" हा चित्रपट पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एका लोककथेवर आधारित हा सिनेमा रहस्य, थरार आणि साहसाने परिपूर्ण असणार आहे. राजीव खिंची आणि बॉबी शाह या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक टिनू वर्मा असून लेखक सहार काझी आहेत.

राजीव खिंची आणि बॉबी शाह यांनी या चित्रपटाबद्दल सांगितले की, "कर्माण्य" चित्रपटाची कथा काळाच्या पलीकडची आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी एक अतिशय भव्य आणि रोमांचक कथा घेऊन येत आहोत. चित्रपटाच्या अनेक महत्त्वाच्या भागांचे शूटिंग इतर देशांमध्ये देखील केले जाणार आहे.

रहस्यमय आणि थ्रीलर "कर्माण्य" - राइज ऑफ अ डेमिगॉड

"कर्माण्य" - राइज ऑफ अ डेमिगॉड हा एक भारतीय अमेरिकन चित्रपट आहे जो भारतीय लोककथेवर आधारित आहे आणि एक रहस्यमय आणि थ्रीलर शैलीचा चित्रपट आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की "कर्माण्य" हा जागतिक स्तरावरील चित्रपट आहे आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांना या प्रकल्पासाठी रणनीतीसह साइन केले गेले आहेत. स्टारकास्टची घोषणा लवकरच होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news