Prajakta Mali | 'देवाच्या दारात कुणी...; 'त्र्यंबकेश्वर'मधील नृत्य वादावरून प्राजक्ता काय म्हणाली?

Prajakta Mali | 'त्र्यंबकेश्वर'मधील नृत्य वादावरून प्राजक्ता माळी काय म्हणाली?
Prajakta Mali
नृत्य वादावरून प्राजक्ताने स्पष्टीकरण दिलं Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी महाशिवरात्रोत्सवानिमित्त यावर्षी आयोजित केलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या शिवार्पणमस्तु नृत्य कार्यक्रमावरून वादाचे तांडव निर्माण झाले आहे. ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी या कार्यक्रमाला आक्षेप नोंदवलाय. दरम्यान, प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने आपल्या शास्त्रीय नृत्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

प्राजक्ता माळीने केला खुलासा

तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिने नृत्याविषयी खुलासा केला आहे. ती व्हिडिओमध्ये काय म्हणते पाहुया.

''त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून मला फोन आला. आम्ही महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी मंदिराच्या प्रांगणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. येथे अनेक दिग्गज आपली कला सादर करतात. तर आम्हाला कळलं की, तुम्ही भरतनाट्यम नर्तिका आहात तर यंदाच्या वर्षी तुम्ही शास्त्रीय नृत्य सादर कराल का? तर मी वेळ न घालवता त्यांना होकार कळवला. मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की, महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम संपूर्णपणे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर आधारित असेल. मी स्वत: भरतनाट्यम नर्तिका आहे. अपुऱ्या माहितीमुळे जर कुणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतु-परंतु काढून टाकावे. समाजाची दिशाभूल करू नये, अशी मी त्यांना विनंती करते. आणि देवाच्या दारात कुणी सेलिब्रिटी नसतो. सर्वजण भक्त असतात. त्याच भक्ती भावनेने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून मी माझी सेवा नटराजाच्या चरणी अर्पण करणार आहे. म्हणूनच कार्यक्रमाचे नाव शिवार्पणमस्तु असा आहे. वेळेअभावी मी दोनच रचना सादर करणार आहे. बाही सहकलाकार सादर करतील... कार्यक्रमाचे स्वरुप शास्त्र नृत्याचे असेल, असे मी आवर्जुन नमूद करेन...'' असे प्राजक्ताने म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी मंदिर प्रांगणात सेलिब्रेटींचे कार्यक्रम करण्याचा पायंडा नको म्हणत या कार्यक्रमाला आक्षेप नोंदवणारे पत्र नाशिक ग्रामीण पोलिसांना दिले. तसेच पुरातत्त्व विभागाने या कार्यक्रमाला आक्षेप घेणारे पत्र देत केंद्रीय कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. परंतु पूर्वनियोजित हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे देवस्थानने जाहीर केले आहे.

१२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त लाखो भाविक त्र्यंबकराजाचे दर्शन घेत आहेत. अशातच त्र्यंबकेश्वर देवस्थानने मराठी अभिनेत्री तथा नृत्यांगणा प्राजक्ता माळी हिचा सांस्कृतिक नृत्याविष्काराचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' हा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात बुधवारी (दि. २६) आयोजित केला आहे. कार्यक्रमाला लाखो लोकांनी उपस्थिती लावल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्य पुरातत्त्व विभागाने विरोध दर्शवित पत्र लिहून कार्यक्रम घेण्यास विरोध दर्शविला आहे. प्राचीन स्मारक आणि पुरातत्त्वीय स्थळ, अवशेष अधिनियम १९५८ या कायद्यानुसार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर मंडल, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांनी आक्षेप घेतला आहे. कार्यक्रमापूर्वी दिल्लीच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाची परवानगी घेण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाने दिले आहेत.

पण देवस्थानाच्या विश्वस्तांनी सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होतील. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news