Prahaar Teaser | राजकुमार रावचं धक्कादायक ट्रान्सफॉर्मेशन; उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत जबरदस्त लूक, 'प्रहार' व्हिडिओ पाहाच

Prahaar teaser: 'प्रहार'ची पहिली झलक समोर; राजकुमार रावचं ट्रान्सफॉर्मेशन, प्रहारच्या टीझरमधून उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारलीय या अभिनेत्याने (व्हिडिओ)
rajkumar rao
Prahaar Teaser out pudhari photo
Published on
Updated on
Summary

'प्रहार' चित्रपटाच्या टीझरमधून अभिनेता Rajkummar Rao यांचा नवा अवतार समोर आला आहे. प्रसिद्ध सरकारी वकील Ujjwal Nikam यांच्या भूमिकेत त्यांनी केलेले ट्रान्सफॉर्मेशन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टीझरमध्ये त्यांची देहबोली, संवादफेक आणि व्यक्तिमत्त्व उज्ज्वल निकम यांच्याशी साधर्म्य दाखवताना दिसत असून, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

movie Prahaar Teaser released

अभिनेता राजकुमार राव लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'प्रहार' या कोर्टरूम ड्रामा चित्रपटात ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. निर्मिती संस्था मॅडॉक फिल्म्सने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला. टीझर शेअर करताना त्यांनी, "न्यायाला जेव्हा ठाम आवाजाची गरज होती, तेव्हा एक व्यक्ती त्याचा 'प्रहार' ठरली. राजकुमार राव उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेतून सत्याची बाजू मांडताना दिसतील," असे म्हटले आहे.

सुमारे १ मिनिट ५३ सेकंदांच्या या टीझरमध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेची झलक दाखवण्यात आली आहे. यात राजकुमार राव, निकम यांच्या भूमिकेत, अजमल कसाबविरुद्ध सरकारी पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडताना तसेच त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी युक्तिवाद करताना दिसतात.

rajkumar rao
Samantha Ruth Prabhu | पहिल्या अपत्याची चाहूल! अभिनयातून काही काळ विश्रांती, सामंथाच्या मॅटर्निटी ब्रेकची चर्चा

दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या या चित्रपटात वामिका गब्बी, जयदीप अहलावत, सिकंदर खेर, आशिष विद्यार्थी, ललित प्रभाकर आणि ऋत्विक सहोरे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 'प्रहार' भारतीय इतिहासातील काही गाजलेल्या फौजदारी खटल्यांचा मागोवा घेतो. १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट आणि २००८ मधील दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित न्यायालयीन लढ्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी निभावलेल्या भूमिकेवरही चित्रपट प्रकाश टाकतो.

दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सच्या निर्मितीखाली तयार झालेला हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, राजकुमार राव सध्या माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित बायोपिकच्या चित्रीकरणात बिझी आहे. हा चित्रपट भारतीय संघासोबत २०११ पर्यंतच्या गांगुली यांच्या क्रिकेट प्रवासाचे चित्रण करणार आहे.

rajkumar rao
Deepali Sahay |'तेरे पास मैं' गाण्यामुळे चर्चेत आलेली दीपाली सहाय कोण? 'इंडियन आयडल'मधील पराभवानंतरही हार मानली नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news