Rachael Lillis |Pokemon च्या मिस्टी-जेसीला आवाज देणाऱ्या रशेलचे ब्रेस्ट कॅन्सरने निधन

Pokemon च्या मिस्टी-जेसीला आवाज देणाऱ्या अभिनेत्रीचे निधन
Pokemon voice actress Rachael Lillis dies
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘पोकेमोन’च्या मिस्टी आणि जेसी यांना आवाज देणारी व्हॉईस ॲक्ट्रेस रशेल लिलीसचे निधन झाले. ती ४६ वर्षांची होती. रशेलचे निधन १० ऑगस्ट रोजी झाले होते. ती ब्रेस्ट कॅन्सरने पीडित होती. तिला याचवर्षी ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. रशेलने जगभरातील अनेक ॲनिमेनशन सीरीज, कार्टून, व्हिडिओ गेम्सना आपला आवाज दिला होता. (Rachael Lillis dies)

पोकेमोनमध्ये मुख्य पात्र साकारणाऱ्या एश केचुमला आवाज देणाऱ्या आणि रशेल लिलीला को-व्हॉईस ॲक्ट्रेस वर्निका टेलरने तिच्या निधनाची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. तिने रशेलचे जीवन आणि काम आठवण करत दु:ख व्यक्त केलं. एक्स अकाऊंटवर मैत्रीण रशेलसाठी नाम एक मोठी नोट देखील लिहिली.

रशेल लिलीसचा आवाज जगभरात गाजला

वर्निका टेलरने म्हटलं, “मी खूप जड अंत:करणाने हे वृत्त शेअर करत आहे की, शनिवार, सायंकाळी १० ऑगस्ट, २०२४ रोजी रशेल लिलीसचे निधन झाले. रशेलकडे एक असामान्य प्रतिभा होती. जेव्ही ती बोलायची, गायची, तेव्हा तिच्या चमकदार आवाजाने लोकांना आवडायची. तिच्या ॲनिमेटेड भूमिकांसाठी नेहमी आठवण केलं जाईल.”

Pokemon voice actress Rachael Lillis dies
BB Marathi : शेवटी आला, शेवटी जाणार... सूरज म्हणतोय,"ट्रॉफी मीच जिंकणार"

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news