पिरतीचा वनवा उरी पेटला : अर्जुन आणि सावीने बनवला चहा !

पिरतीचा वनवा उरी पेटला
पिरतीचा वनवा उरी पेटला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवर नुकत्याच सुरु झालेल्या पिरतीचा वनवा उरी पेटला मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत अर्जुनाचा swag आणि सावीचा तडफदारपणा लोकांची मन जिंकत आहे. सावीची भूमिका रसिका तर अर्जुनची भूमिका इंद्रनील साकारत आहेत. मालिका सुरु होऊन काही दिवसच झाले असून, सावी आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. (Pirticha Vanva Uri Petla) सावी आणि अर्जुन आता प्रेक्षकांना आपल्या घरातील सदस्य वाटू लागले आहेत. पडद्यावर जरी हे एकमेकांविरुद्ध दिसत असले तरीदेखील पडद्यामागे मात्र यांची धम्माल मस्ती सुरु आहे. (Pirticha Vanva Uri Petla)

मालिकेचे शूट नाशिकमध्ये सुरु आहे. सध्या सगळीकडेच थंडीचे दिवस सुरु असल्‍याने अर्जुन आणि सावीने म्हणजे इंद्रनील आणि रसिकाने मालिकेच्या संपूर्ण crew साठी स्पेशल चहा बनवला. सेटवर सगळेच कलाकार आणि इतर सदस्य या चहाचा आस्वाद घेताना दिसले. एकत्र चहा पिताना सेटवर बऱ्याच गप्पा रंगल्या आपण ते म्हणतो ना "चाय पे चर्चा". सेटवर कलाकार असेच बऱ्याचद धम्माल मस्ती करताना दिसतात.  तेव्हा मालिकेमध्ये काय काय घडेल? सावी आणि अर्जुन एकमेकांसमोर आल्यावर प्रीतीचा वणवा पेटणार उरी? पाहणे रंजक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news