'फुले' चित्रपटावरून वाद; काही संवादावर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

Phule movie | ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट 'या' दिवशी येणार पडद्यावर
Phule movie
फुले’ चित्रपट यादिवशी रिलीज होणारInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांचा 'फुले' या (हिंदी) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतीय समाजसुधारक, विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अनंत नारायण महादेवन यांनी केले आहे. पण 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने फुले चित्रपटाच्या स्क्रिप्टलाच कात्री लावली आहे. बोर्डाने चित्रपटात अनेक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

'फुले' हा एक चरित्रात्मक आहे. ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाची कथा मांडण्यात आली आहे. या दोघा पती-पत्नाने समाजात कशी क्रांती घडवून आणली. त्या काळातील महिला आणि दलितांसाठी त्यांनी कसा बदलाचा मार्ग मोकळा केला, या गोष्टींची झलक ट्रेलरमध्ये दिसते. चित्रपटाचा ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढवली होती. फुले हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र तो आणखी २ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. आता २५ एप्रिल रोजी त्याच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

'फुले' या चित्रपटाला काही ब्राह्मण संघटनांनी विरोध केल्यामुळे प्रदर्शनात बिलंब होत आहे. दरम्यान चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना एकूण १२ बदल सुचवले आहेत. यामध्ये काही संवाद हटविणे, काही संवाद कमी करणे, ऐतिहासिक संदर्भ बदलणे तसेच उपशीर्षकांमध्ये (सबटायटल्समध्ये) बदल सुचवले आहेत.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (cbfc) 'फुले' या हिंदी चित्रपटात कोणते बदल सुचवले आहेत ते खालीलप्रमाणे;

  • चित्रपटाच्या सुरुवातीला दिलेल्या डिस्क्लेमरचा स्क्रीन टाइम वाढवावा. जेणेकरून ते जास्त काळ स्क्रीनवर राहील आणि वाचता येईल.

  • चित्रपटाच्या एका प्रसंगात जिथे एक माणूस झाडू मारत आहे आणि काही मुलं सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकत आहेत, ही दृश्ये बदलावी लागतील.

  • चित्रपटातील संवाद, "शूद्राने झाडू बांधून चालावे..." हे वाक्य "आपण अशाच प्रकारे सर्वांपासून अंतर राखले पाहिजे का...?" असा सुधारित बदल करण्यास सांगितले आहे.

  • ''३००० वर्षे जुनी... गुलामगिरी...'' ऐवजी ''ती अनेक वर्षे जुनी आहे...'' असा शब्द वापरायला हवा.

  • ''खरी पेशवाई असती... तर हात-पाय वेगळे करून टाकले असते...'' हा संवाद ''नशीब चांगलं होतं, राजेशाही असती ना... तर हात-पाय वेगळे करून टाकले असते...'' अशा संवादाने बदलण्याची सूचना आहे.

  • 'मांग', 'महार' असे शब्द बदलण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news