

Anurag kashyap Remark On Brahmin:
मुंबई: देशात जाती आणि वाद हे समीकरण कायमच एकत्र नांदताना दिसते. मग त्याचे कारण जेवणाची पद्धत ते सिनेमा काहीही असू शकते. आताही अशाच एका सिनेमामुळे सुरू झालेल्या वादाच्या ठिणगीचे आता वणव्यात रूपांतर झाले आहे. दिग्दर्शक, अभिनेता अनुराग कश्यपने नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे पुनः एकदा ट्रोलर्सच्या रडारवर आला आहे.
याला कारण आहे 'फुले' सिनेमा. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा राव यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 11 एप्रिलला रिलीज होणार होता. पण त्यातील काही सीन आक्षेपार्ह असल्याचे सांगत यांची रिलीजची तारिख बदलली. आता ती 25 एप्रिलपर्यंत पुढे गेली आहे. या सिनेमाची तारीख बदलल्याने अनुराग कश्यपने सोशल मिडियावर पोस्ट लिहीत निषेध व्यक्त केला.
एवढे करून थांबेल तो अनुराग कसला? त्याने एका युजरच्या कमेंटवर रिअॅक्ट होताना त्याने तळतंत्रच सोडला. ;ब्राह्मणवर मी लघुशंका करेन' अशी वादग्रस्त कमेंट करून त्याने ट्रोलर्सना आयते कुरण दिले आहे.
यापुढेही अनेक कमेंटमध्ये त्याने 'मला फुले माहिती आहेत' आणि 'हे मोदीजीना पाठवा' अशा कमेंट केल्या आहेत.
याला खरी सुरुवात केली ती अनुरागच्या इन्स्टा पोस्टने. 'धडक 2 आणि संतोष या सिनेमांवेळी असे समजले कि मोदीजीनी जातीव्यवस्था बंद केली आहे. आता फुले सिनेमातील दृश्याने ब्राह्मण दुखावले आहेत. जर जातीव्यवस्थाच नसेल तर ब्राह्मण आलेच कुठून? तुम्हाला का त्रास होतोय? जर जातीव्यवस्थाच नव्हती तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले आले कुठून? एकतर ब्राम्हण्यवाद अस्तित्वातच नाही. करण मोदीजी यांच्या मते जातीव्यवस्थाही अस्तित्वात नाही. सगळे मिळून एकदा हे ठरवा.’ अशा आशयाची अनुरागने पोस्ट लिहली आहे.
X वरही अनुरागच्या पोस्टने लक्ष वेधले आहे. यावर तो पोस्ट करताना म्हणतो, ‘ मी शहर बदलले आहे, पण फिल्ममेकिंग सोडले नाही. ज्यांना मी वैफल्यग्रस्त वाटत असेन त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मी शाहरुख खान पेक्षा जास्त बिझी आहे. येत्या 2028 पर्यंत माझ्याजवळ देण्यासाठी तारखा नाहीत. सध्या 5 प्रोजेक्ट दिग्दर्शित करतो आहे. जे येत्या 2 वर्षात रिलीज होतील. माझ्याकडे सध्या खूप काम आहे. त्यामुळेच मी आज 3 प्रोजेक्ट नाकारले आहेत. त्यामुळे कृपया स्वत: च्या कामापूरते पहावे असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.