Pavitra Punia Engagement | पवित्रा पुनियाच्या रोमँटिक बीच प्रपोजलचे फोटो व्हायरल, बॉयफ्रेंड आहे मुंबईचा बिझनेसमन
मुंबई - एक्स बॉयफ्रेंड एजाज खानशी नातं तुटल्यानंतर अभिनेत्री पवित्रा पुनिया पुन्हा प्रेमात पडलीय. खास म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडने गुडघ्यवर बसून तिला प्रपोज केलं आहे. समुद्रकिनारी या सुंदर क्षणांचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिग बॉस १४ मधून पवित्र पुनियाची खूप चर्चा झाली होती. आता रिपोर्टनुसार, बिझनेसमनच्या प्रेमात ती पडली असून तो मुंबईचा आहे. तिने फोटोंमध्ये चहरा आणि त्याचे नाव दोन्हीही जाहिर केलेले नाही.
असे म्हटले जात आहे की, बिजनेसमॅन सोबत तिने लपून छपून साखरपुडा केला आहे. हे वृत्त त्यांच्या फॅन्ससाठी खूप धक्कादायक ठरणारे आहे. कारण काही महिन्यांपूर्वी तिचे अभिनेता ईजाज खानशी ब्रेकअप झाले होते. पवित्राने आपला साखरपुडा खासगी ठेवला होता. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी सहभागी झाले होते.
बिझनेसमन बॉयफ्रेंडने तिला समुद्रकिनारी एक रोमँटिक सरप्राईज दिलं आहे. त्याने गुडघ्यावर बसून पवित्राला प्रपोज केलं आणि त्या क्षणाचे फोटो व व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमध्ये पवित्रा लाल रंगाच्या सुंदर गाऊनमध्ये दिसत आहे, तर तिचा बॉयफ्रेंड ब्लॅक सूटमध्ये स्टायलिश लूकमध्ये आहे. समुद्राच्या लाटांमध्ये, सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर झालेलं हे प्रपोजल अगदी चित्रपटातील सीनसारखं वाटतं. पवित्राने आनंदाने होकार दिल्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारत रोमँटिक पोझ दिली.
फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी तर पवित्रा लग्नाची तयारी करतेय का? असा प्रश्नही विचारला आहे.
पवित्रा पुनिया यापूर्वी अभिनेता एजाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांची जोडी बिग बॉसच्या घरात चर्चेत आली होती, मात्र काही काळानंतर त्यांचे नाते तुटले. आता पवित्रा तिच्या नव्या बिझनेसमन बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतंय.
पवित्रा पुनियाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली होती आणि तिच्या ग्लॅमरस लुक्समुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे.

