Parvati Nandana Song | वंदना गुप्ते यांचं बाप्पासाठी स्पेशल गाणं, तुम्ही ऐकलं का?

वंदना गुप्ते यांचं बाप्पासाठी स्पेशल गाणं
Parvati Nandana Song
वंदना गुप्ते यांचं बाप्पासाठी नवं गाणं रिलीज youtube
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - गणेशोत्सव हा बाप्पाच्या गीतांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. गणेशोत्सवाचे वेध लागताच सगळीकडे बाप्पाचं नामस्मरण करणारी गीते ऎकायला मिळतात. दरवर्षी बाप्पाची नवनवीन गीते येत असतात. आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणाऱ्या अभिनेत्री वंदना गुप्ते आणि आपल्या तरल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका उत्तरा केळकर या जोडीचा 'पार्वती नंदना' हा सोलो अल्बम ‘आदित्य नायर प्रोडक्शन्स’ च्या वतीने नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. कौतुक शिरोडकर यांच्या लेखणीतून सजलेल्या या गाण्याला गायिका उत्तरा केळकर, बालगायक आदित्य.जी. नायर यांचा स्वरसाज लाभला आहे. प्रवीण कुंवर यांचे संगीत आहे. गुरु नायर प्रॉडक्शन्स या अल्बमचे निर्माते आहेत.

Parvati Nandana Song
youtube

कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणेशाचे वंदन करुनच करतो. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व उल्हासाचे प्रतीक आहे. या दिवसात प्रत्येकामध्ये एक उत्साह पहायला मिळतो. हाच उत्साह आजी आणि नातवाच्या या गाण्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

पार्वतीनंदना

एकदंत गजानना

दुर्वाहार तुझ्या गळ्यामधे शोभतो

तुझे कान भले मोठे

अन डोळे छोटे छोटे

कसा बाप्पा तू गोजिरा वाटतो

असे बोल असलेल्या या गाण्यात आजी आणि नातवाचं बाप्पाप्रती असलेले प्रेम दिसून येतंय.

पिढी मागोमाग पिढी बदलत जाते. काळ पुढे सरकत जातो. पण आपण अनुभवलेल्या एक एक गोष्टी पुढच्या पिढीच्या पदरात टाकताना अनुभवाचे गाठोडे अलगद सोडवावे लागते. तरच त्या अनुभवाचा गोडवा पुढच्या पिढीला चाखता येतो. गणपती उत्सवाच्या याच आनंददायी सोहळ्याचं महत्त्व आपल्या नातवाला गाण्यातून समाजवणारी आजी या गाण्यात दिसणार आहे. गणेशोत्सव हा कुटुंबांना बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. हे गाणं करताना या सगळ्याचं समाधान नक्कीच जाणवलं.

अभिनेत्री वंदना गुप्ते

कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते, त्यमुळे एक छान गाणं गायला मिळाल्याचा आनंद उत्तरा केळकर यांनी व्यक्त केला. चांगल्या टीमसोबाबत श्रीगणेशाचं गीत करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माते गुरु नायर यांनी व्यक्त केला.

Parvati Nandana Song
बर्लिनच्या रिलीजपूर्वी अपारशक्ती खुराणा आईसोबत सिद्धिविनायक मंदिरात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news