Parineeti Chopra | आमचे छोटेसे विश्व येत आहे..परिणीतीच्या घरी हलणार पाळणा; राघव चड्ढा यांनी शेअर केली पोस्ट

आमचे छोटेसे विश्व येत आहे..परिणीती चोप्राच्या घरी हलणार पाळणा; राघव चड्ढा यांनी शेअर केली पोस्ट
image of Raghav Chadha-Parineeti Chopra
Parineeti Chopra - Raghav Chadha shared good newsInstagram
Published on
Updated on

Parineeti Chopra give good news

मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्राच्या घरी पाळणा हलणार आहे. तिने ही गुड न्यूज फॅन्ससोबत शेअर केलीय. सोशल माडियावर परिणीती आणि तिचे पती राघव चड्ढा यांनी फोटो, व्हिडिओ पोस्ट कर आनंदाची बातमी जाहीर केलीय. दोघे २०२३ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. दन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर परिणीती-राघव आई-बाबा होणार आहेत.

image of Raghav Chadha-Parineeti Chopra
Haiwaan| 'मैं खिलाडी..तू अनाडी'... तब्बल १८ वर्षानंतर अक्षय-सैफ एकत्र; 'हैवान'ची घोषणा

परिणीतीने पोस्टमध्ये काय लिहिलं?

परिणीतेने आमचे छोटेसे विश्व... मार्गावर आहे..खूप आशीर्वाद अशी कॅप्शन इन्स्टा फोटो पोस्टवर लिहिली आहे.

सोबतच एक फोटो आणि एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. फोटोमध्ये एका वर्तुळाकार थाळीत १+१=३ असे लिहिले असून त्याखाली चिमुकली पावले रेखाटली आहेत. तर व्हिडिओमध्ये परिणीती आणि तिचा पती राघव चड्ढा हातात हात गालून पाठमोरे चालताना दिसत आहेत. पण परिणीतीने या पोस्टचे कॉमेंट बॉक्स सेक्शन बंद ठेवले आहे. पण या पोस्टवर २० लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. परिणीतीसह राघव चड्ढा यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केल्या आहेत.

image of Raghav Chadha-Parineeti Chopra
Bigg Boss 19 | पहिल्याच दिवशी एलिमिनेशनची टांगती तलवार; कंटेंस्टेंटमध्ये जोरदार भांडण

सेलिब्रिटींनी केले अभिनंदन

या कपलने ही आनंदाची बातमी कळवताच, फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी अभिनंदन केले आहे. सोनम कपूरने म्हटले, “अभिनंदन डार्लिंग ️.” तर निमरत कौरने म्हटले, “आशीर्वादित राहा खूप खूप अभिनंदन!!!”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news