Param Sundari Trailer | नॉर्थ-साऊथची रोमँटिक केमिस्ट्री; सिद्धार्थ-जान्हवीचा 'परम सुंदरी' ट्रेलर पाहाच!
janhvi sidharth Param Sundari Tailer released
मुंबई - दिनेश विजान-मॅडॉक फिल्म्सचा रोमँटिक ड्रामा परम सुंदरीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. तुषार जलोटा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट २९ ऑगस्टला रिलीज होणार आहे. यामध्ये जान्हवी कपूर-सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. केरळच्या सुंदर धरतीवर चित्रपटाची कहाणी साकारण्यात आलीय. उत्तर आणि दक्षिण भारताची संस्कृती चित्रपटातून दिसते. 'परम सुंदरी'ची कथा दोन वेगवेगळ्या संस्कृतीची कहाणी आहे. दोघांना एकमेकांशी प्रेम होतं आणि हंगामा देखील.
सचिन–जिगर यांचे संगीत आहे तर गाणी अमिताभ भट्टाचार्य यांची आहे. या प्रेमकहाणीची झलक ट्रेलरमधून दिसते. 2 मिनिट ४० सेकंदांच्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, ड्रामा आणि इमोशन्स सर्व काही आहे. नॉर्थ-साऊथची मजेशीर लव्ह स्टोरी पाहण्यासाठी चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहावी लागेल.
काय म्हणाले नेटकरी?
ट्रेलरची सुरुवात चर्चच्या आतून होते. रोमँटिक सीननंतर दोघे दंगा-मस्ती करताना दिसतात. एका नेटकऱ्याने म्हटलंय-कदाचित ही तमिळ चित्रपटाची कॉपी आहे. आणखी एकाने म्हटले-लास्ट डायलॉग देखील कट होईल. ज्यामध्ये जान्हवी नॉर्थ इंडियन विरोधात आपला राग व्यक्त करताना दिसते.
परम सुंदरीच्या प्रमोशनमध्ये जान्हवीने साऊथ इंडियन लूक केला होता. बॅकलेस ब्लाऊज, मोतींनी डिझाईन केलेला आऊटपिट तिने परिधान केला होता. सोबत तिने मॅचिंग ज्वेलरी परिधान केली होती. लाईट गोल्डन कलर लेहेंगा, ग्लॉसी मेकअप, कपाळावर बिंदी आणि केसात गजरा असा तिने लूक केला.

