

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडची अपकमिंग फिल्म ‘परम सुंदरी’ सध्या खुपच चर्चेत आहे. तुषार जलोटाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपटातील गाणी दर्शकांचे लक्ष वेधून घेत आहे.
एकीकडे चित्रपटाची चर्चा सुरु असताना आता चित्रपटातील कलाकारांनी घेतलेल्या फीची चर्चाही रंगली आहे. चला तर मग जाणून घेवूया सिद्धार्थ मल्होत्रा ते जान्हवी कपूर यांनी या चित्रपटासाठी नेमकी किती फी आकारली आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने ‘परम सुंदरी’साठी आकारली सर्वात जास्त फी
‘परम सुंदरी’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्राने नॉर्थ इंडियन परम नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी त्याने 10 ते 12 करोड इतकी मोठी रक्कम आकारली आहे. इतकी मोठी रक्कम आकारून तो या चित्रपटातील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे.
जान्हवी कपूर ने किती आकारले मानधन?
या चित्रपटात जान्हवी कपूर सिद्धार्थच्या अपोजिट दिसणार आहे. ती सुंदरी नावाच्या साउथ इंडियन मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून सिद्धार्थ - जान्हवी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी जान्हवीने 4 ते 5 करोड रुपये फी घेतली आहे.
संजय कपूरने आकारली 'इतकी' फी
या चित्रपटात संजय कपूर महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. संजय कपूर बऱ्याच वेळानंतर कोणत्यातरी मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना या फिल्मसाठी जवळपास 50 लाख रुपये देण्यात आले आहेत.
‘फुकरे’ फेम मनजोत सिंहने घेतली 'इतकी' फी
‘फुकरे’ फेम एक्टर मनजोत सिंहने या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला २५ लाख रुपये दिले आहेत. साउथ चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते रेन्जी पणिक्करही या चित्रपटाचा भाग आहेत. त्यांना या चित्रपटासाठी 25 ते 30 लाख रुपये इतकी फी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
‘परम सुंदरी’चे बजेट किती?
‘परम सुंदरी’ चित्रपटाची निर्मिती मॅडॉक स्टुडिओजने केली आहे. या प्रोडक्शन हाउसने 'स्त्री 2' आणि 'छावा' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटासाठी जवळपास 45 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. हा चित्रपट 29 ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.