Bollywood & Paparazzi Story: PR शिवाय बॉलीवूड स्टार होता येतं का? स्टार Paparazzi मानव मांगलानींनी सांगितलं पडद्यामागच्या गोष्टी

स्टार Paparazzi मानव मांगलानींनी दिलखुलास मुलाखत दिली आहे.
Bollywood & Paparazzi Story
Bollywood & Paparazzi Storypudhari
Published on: 
Updated on: 

Bollywood & Paparazzi Story: बॉलीवूडचे सुपर स्टार हर घडीला काय करत असतात त्या सर्वावर पाळत ठेवणारी जमात म्हणजे पापाराझ्झी (Paparazzi). बॉलीवूड स्टार आज कुठं जाणार, आज काय घातलं आहे याची सर्व माहिती आपल्याला यांच्याकडूनच मिळत असते. मात्र नेहमी हे Paparazzi कोणता स्टार या घडीला काय करणार याची एवढी अचूक माहिती कशी मिळवतात अशी उत्सुकता सामान्याना असते. याबाबतच स्टार Paparazzi मानव मांगलानींनी दिलखुलास मुलाखत दिली आहे. अनस्क्रिप्टेड विथ केना शहा यांच्याशी बोलातना त्यांनी अनेक कॅमेऱ्यामागचे राज उघड केले आहेत.

Bollywood & Paparazzi Story
Bollywood : सैफ अली खान.. केबीसी आणि तूप, का होत आहेत मीम्स व्हायरल?

केना शहा यांनी मानव यांना ज्यावेळी एखादा सेलेब्रिटी स्पॉट होतो त्यावेळी तो खरंच एक योगायोग असतो की ते आधीपासूनच प्लॅन असतं असा थेट प्रश्न विचारला. त्यावर अत्तर देताना मानव म्हणाले की, 'अनेकवेळा सेलेब्रिटी हे अचानक स्पोट होतात. फक्त २० ते २५ टक्के प्रकरणात ते आधीपासूनच प्लॅन असतं. आम्ही कोणत्या सेलेब्रिटीने कोणता चित्रपट साईन केला आहे. कोणत्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. त्यांचे आगामी कोणते कार्यक्रम आहेत. ते कोणत्या ब्रँडचे शूटिंग करणार आहेत याची माहिती मिळवतो. आमच्या कामाचा सर्वाच मोठा भाग हा माहिती मिळवणे, अलर्ट राहणे आणि दुसऱ्यापेक्षा एक पाऊल पुढं असणं हा असतो.'

Bollywood & Paparazzi Story
Bollywood Actor Security: सलमानच्या घराची रेकी; कडेकोट सुरक्षेमुळे टायगर श्रॉफला लक्ष्य?

एखादी पीआर स्ट्रॅटेजी एखाद्या सेलेब्रिटीची इमेज वाचवण्यासाठी वापरली जाते मात्र त्यामुळं ती जास्तच बिघडते तुम्ही असं होताना कधी पाहिलं आहे का? असा प्रश्न शहा यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना मानव म्हणाले, अनेकवेळा त्यांच्या अपेरियन्स मुळे गोष्टी उलटतात. त्यांच्याकडे १० ते १५ कॅमेरे सतत रोखलेले असतात. त्यांचे हावभाव, रिअॅक्शन, त्यांचे प्रत्येक शब्द कॅमेऱ्यात कैद होतात तेही वेगवेगळ्या अँगलने. ज्यावेळी तो व्हिडिओ बाहेर येतो तुमचे त्याच्यावर नियंत्रण रहात नाही.

Bollywood & Paparazzi Story
Bollywood News : ‘वरच्याने ठरवल्या आहेत...’ सुनीताच्या धोका दिल्याच्या आरोपांवर गोविंदाने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला..

मानव यांना पापाराझ्झी किंवा सोशल मीडियाशिवाय जग कसं असतं असा देखील प्रश्न विचारण्यात आला. तसेच कोणत्या सेलेब्रिटीची सर्वात चांगली लिंक्डइन प्रोफाईल आहे असं विचारण्यात आलं.

त्यावेळी मानव मांगलानी यांनी सांगितलं की सोशल मीडिया विरहीत जग हे अधिक शांत असतं. लिंक्डइन प्रोफाईलच्या बाबतीत क्रिकेटमध्ये सर्वाधिक फॅन बेस विराट कोहलीचा आहे आणि त्याचे लिंक्ड इन प्रोफाईल आकर्षक आहे. तर अभिनय क्षेत्रातील व्यक्तीबाबत बोलायचं झालं तर ऐश्वर्या रायची लिंक्ड इन प्रोफाईल चांगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.