Bollywood Actor Security: सलमानच्या घराची रेकी; कडेकोट सुरक्षेमुळे टायगर श्रॉफला लक्ष्य?

आमीर खान, अक्षय कुमार यांच्याही निवासस्थानांची पाहणी केल्याचा संशय
Bollywood Actor Security
Bollywood Actor SecurityPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. टायगर श्रॉफ हे हल्लेखोरांचे मूळ लक्ष्य नव्हते, तर अभिनेता सलमान खान याला लक्ष्य करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, अशी माहिती तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.

सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाची रेकी केल्यानंतर तेथील कडेकोट सुरक्षा पाहून हल्लेखोरांनी कथितपणे दुसरे लक्ष्य निवडले. आमीर खान, अक्षय कुमार यांच्या निवासस्थानांचीही पाहणी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घडामोडींनंतर बॉलीवूड कलाकारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Bollywood Actor Security
Cyber Fraud Money Trail: गुन्हा एका राज्यात, पैशांचा माग दुसऱ्या देशात; पोलिसांची डोकेदुखी

सलमान खान : वाय-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ संरक्षणात वाढ

सलमान खानला यापूर्वीच वाय-प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटस्‌ या निवासस्थानाबाहेर सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असतो. एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती.

आता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या निवास स्थानाबाहेरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घरातील बुलेटप्रूफ काचांच्या संरक्षणातही सुधारणा केली जात असल्याचे समजते.

Bollywood Actor Security
Cooperative Bank Election: सहकारी बँकांतील दिग्गजांना मोठा धक्का! १० वर्षे संचालक राहिल्यास निवडणूक लढवता येणार नाही

आमीर खान : निवासस्थानाजवळ पोलिसांची गस्त

आमीर खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानाजवळही पोलिसांनी गस्त वाढवली आहे. टायगर श्रॉफ यांच्यावरील हल्ल्यानंतर संभाव्य लक्ष्य असलेल्या कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. आमीर खानच्या घराची पाहणी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अक्षय कुमार : घरात बुलेटप्रूफ काचा बसविण्याची तयारी

अक्षय कुमार याच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या खिडक्यांना बुलेटप्रूफ काचांचे संरक्षण देण्याचे काम सुरू असल्याचे २१ ऑक्टोबरच्या वृत्तांत म्हटले आहे. गोळीबाराच्या तपासात अन्य कलाकारांच्या घरांची पाहणी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर हा खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे.

टायगर श्रॉफ : सुरक्षेतील त्रुटीचा फायदा?

१८ ऑक्टोबर रोजी जुहू परिसरात टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या घटनेत अभिनेता सुरक्षित राहिला; मात्र गोळीबारात सात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हल्ल्यानंतर आरोपींनी मुंबई सोडून पळ काढला होता. राजस्थानातील कोटा येथे तिघांना अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news