Pankaj Tripathi Brother Attack: पंकज त्रिपाठीच्या भावावर कुऱ्हाडीने जिवघेणा हल्ला; अजून लेखी तक्रार नोंदवली नाही

Pankaj Tripathi Brother Attack
Pankaj Tripathi Brother Attackpudhari
Published on
Updated on

Pankaj Tripathi Brother: बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या भावाला विजेंद्रनाथ यांच्यावर रविवारी काठ्या आणि गोल्फ क्लबने आणि कुऱ्हाडीने जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला बिहारमधील त्यांच्या मूळ गावी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं.

Pankaj Tripathi Brother Attack
Ahilyanagar Firing Case: अहिल्यानगर पाईपलाईन रोड हल्ला व गोळीबार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे मूळ गाव बेलसंद हे गोपाळगंज जिल्ह्यातील बरौली शहराजवळ आहे. तिथं जमिनीच्या वादातून पंकज त्रिपाठी यांचे बंध विजेंद्रनाथ यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. विजेंक्र यांना या हल्ल्यानंतर गोपळगंज येथील मॉडेल रूग्णालयात रात्री उशीरा दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पटना येथील रूग्णालयात पाठवण्यात आलं.

Pankaj Tripathi Brother Attack
Rahuri Sand Mining: दरडगाव परिसरात बिनधास्त वाळू उपसा; तक्रारीनंतरही प्रशासनाची टोलवाटोलवी?

या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती देणं टाळलं आहे.

Pankaj Tripathi Brother Attack
Rahata Molestation Case: विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर

मात्र गोपाळगंजमधील एसपी विनय तिवारी यांनी हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे असं सांगितलं. एसपींनी पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबियांनी अजूनपर्यंत याबाबत लेखी तक्रार केली नसल्याचं सांगितलं. ज्यावेळी अधिकृत तक्रार मिळेत पोलीस पुढची कायदेशीर कारवाई करतील असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news