Ahilyanagar Firing Case: अहिल्यानगर पाईपलाईन रोड हल्ला व गोळीबार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

व्यावसायिकावर झालेल्या हल्ला व हवेत गोळीबार प्रकरणात पोलिसांची कारवाई; दोन आरोपी अद्याप फरार
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

नगर: सावेडीतील पाईपलाईन रस्ता परिसरात रविवारी व्यावसायिक चिरंजीव दत्तात्रय गाढवे (वय 31) यांच्यावर झालेला हल्ला व हवेत गोळीबार प्रकरणात तोफखाना पोलिसांनी भिंगार परिसरातील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी आणखी दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

Arrest
Ahilyanagar Spa Raid: अहिल्यानगरमध्ये स्पा सेंटरवर छापा; देहविक्री रॅकेट उघड, चार महिलांची सुटका

मात्र, उर्वरित दोन संशयित आरोपी अद्याप पसार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या मुलांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Arrest
Ahilyanagar BJP Candidate: अहिल्यानगरमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय हालचाली; प्राजक्त तनपुरे यांना संकेत

गाढवे 24 मे रोजी सकाळी मित्रासोबत पाईपलाईन रस्त्यावरील चहाच्या दुकानात थांबले असताना तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. यातील एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर वार केला.

Arrest
Gram Panchayat Reservation 2026: अहिल्यानगर जिल्ह्यात 870 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

त्यानंतर दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर संशयितांनी पळ काढताना हवेत गोळीबार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चार संशयित एका दुचाकीवरून आल्याचे निष्पन्न झाले.

Arrest
Parner Hospital Protest: पारनेर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पैसे मागितल्याचा आरोप; गांधीगिरी आंदोलन

तांत्रिक तपास व माहितीच्या आधारे पोलिसांनी एकाला पाथर्डीतून व दुसऱ्याला भिंगारमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी भिंगारमधील आणखी दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news