

Panchayat Season 4 trailer Release Date
मुंबई : प्राईम व्हिडिओने पंचायत सीझन ४ चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ‘द व्हायरल फिव्हर’ द्वारा निर्मित, ‘पंचायत’ सीझन ४ ची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी केली आहे, कथा चंदन कुमार यांची असून दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांचे आहे. या लोकप्रिय ग्रामीण विनोदी सीरीजच्या नवीन सीझनमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवर आणि पंकज झा यांसारख्या प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांची फौज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
पंचायत’ सीझन ४ कधी रिलीज होणार? panchayat season 4 release date
निर्मात्यांनी नवीन सीझनची प्रदर्शन तारीखही निश्चित केली. ‘पंचायत’ सीझन ४ आता २४ जून रोजी प्राईम व्हिडिओवर भारतात आणि जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
फुलेरा या काल्पनिक गावात घडणाऱ्या या कथेचा नवीन सीझन नवी आव्हाने, ओळखीचे चेहरे आणि भरपूर विनोदी वळणे घेऊन येणार आहे, जो लहान शहराच्या जीवनातील लय, विनोद, आपुलकी आणि बारकावे अचूकपणे दाखवण्यात आले. या मालिकेत जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवर आणि पंकज झा यांसारख्या लोकप्रिय कलाकारांचा समावेश आहे.
‘पंचायत’च्या नवीन सीझनचा ट्रेलर
मंजू देवी आणि क्रांती देवी या दोन तगड्या प्रतिस्पर्धकांमधील सत्तेच्या संघर्षाची एक विनोदी झलक यामध्ये दिसते. प्रचारसभांमधील गाणी, मोठी आश्वासने आणि भरपूर जल्लोषाने गाव एका रणधुमाळीच्या मैदानात बदलते. दोन्ही गट एकमेकांना मागे टाकण्यासाठी आणि एकमेकांविरुद्ध डावपेच आखण्यासाठी धावपळ करत असताना, फुलेरामध्ये गोंधळाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. ठेका धरायला लावणारी देशी गाणी वातावरणाला अधिक रंगतदार बनवतात. हा ट्रेलर प्रेक्षकांना ग्रामीण भागातील धमाल, नाट्य आणि फुलेरामधील आतापर्यंतच्या सर्वात जबरदस्त लढाईचा गोंधळ अनुभवायला मिळणार आहे.
‘पंचायत’ सीझन ४ चे निर्माते आणि लेखक चंदन कुमार म्हणाले, “पंचायतचे लेखन करणे हा एक गहन शोध आणि कृतज्ञतेचा प्रवास आहे. ही मालिका खास यासाठी आहे कारण प्रत्येक सीझन नैसर्गिकरित्या उलगडत जातो.”
मंजू देवीची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता म्हणाल्या, "मंजू देवीची भूमिका साकारणे खूप समाधानकारक ठरले आहे, विशेषतः आज ती पडद्यावरील सर्वात आवडत्या आणि जवळच्या वाटणाऱ्या पात्रांपैकी एक बनली आहे. विविध सीझन्समधून, एका संकोचणाऱ्या प्रधानापासून फुलेराच्या कारभारात आत्मविश्वासाने आवाज उठवणाऱ्या तिच्या प्रवासाला पाहणे रोमांचक ठरले आहे. प्रत्येक अध्यायासह, ‘पंचायत’ केवळ गावच्या जीवनातच नव्हे, तर प्रत्येक पात्राच्या विकासातही खोली आणते. सीझन ४ अनपेक्षित वळणे घेऊन येतो - ज्यामुळे कथा अधिक आकर्षक बनते. ट्रेलर फक्त एक झलक देतो, पण माझ्यावर विश्वास ठेवा – पुढे जे काही आहे ते मजेदार, उत्साही आणि आश्चर्यांनी भरलेले आहे."