Oscar 2025 Laapataa Ladies : ऑस्करच्या रेसमध्ये किरण रावचा 'लापता लेडीज'
पुढारी ऑनलाईन डेस्क - किरण रावच्या 'लापता लेडीज'ची भारताकडून ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री होणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या एका कमिटीने २९ चित्रपटांच्या यादीतून 'लापता लेडीज'ला ऑस्कर २०२५ साठी ऑफिशियल एन्ट्री केलीय.
'लापता लेडीज'ला प्रेक्षकांची दाद
दिग्दर्शक किरण रावचा चित्रपट 'लापता लेडीज' यावर्षी मार्चमध्ये थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. समीक्षक सोबतच प्रेक्षकांनी देखील त्यास दाद दिली. समाजात महिलांची प्रतिमा, कॉमेडी सोबत यावर्षीची सर्वात चर्चित चित्रपटांपैकी तो एक ठरला आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर खूप साऱ्या युजर्सनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, भारताकडून यावर्षी 'लापता लेडीज'ला ऑस्करसाठी पाठवायला हवं. प्रेक्षकांचीही ही इच्छा पूर्ण झाली.
ऑस्करच्या रेसमध्ये 'लापता लेडीज'
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, यावर्षाच्या स्लीपर हिट्समध्ये एक 'लापता लेडीज' भारताकडून यावर्षी ऑस्करमध्ये ऑफिशियल एन्ट्री होईल. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या एका कमिटीने २९ चित्रपटांच्या एका लिस्टमधून 'लापता लेडीज'ला ऑस्कर २०२५ साठी अधिकृत एन्ट्रीसाठी निवडण्यात आलं आहे. कमिटीसमोर पोहोचलेल्या २९ चित्रपटांच्या यादीत 'ॲनिमल' आणि 'आट्टम' यासारखे चित्रपट होते.
'लापता लेडीज'चे पहिले स्क्रीनिंग टोरांटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले होते. किरण रावचा हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये लिमिटेड स्क्रीन्सवर रिलीज केला जाईल. रिपोर्ट्सनुसार, ५ कोटी रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाईड २५ कोटी रुपयांहून अधिक ग्रॉस कलेक्शन केले. या उत्तम चित्रपटासाठी ॲक्टर्स नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवि किशन यांचेही कौतुक झाले आहे. महिलांच्या सेंसिटिव्ह टॉपिकवर उत्तम चित्रपट बनवण्यासाठी किरण रावच्या दिग्दर्शनाचेदेखील खूप कौतुक झाले.

