Constable Manju | मम्मीसाहेबचा पुढचा डाव काय असणार?

'कॉन्स्टेबल मंजू' - मम्मीसाहेबचा पुढचा डाव काय असणार?
Constable Manju
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेत पुढे काय घडणार, जाणून घ्या Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'कॉन्स्टेबल मंजू' मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे, आपल्या आकर्षक कथानक आणि दमदार कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे या मालिकेला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत मोनिका राठी, वैभव कदम आणि विद्या सावळे म्हणजेच ‘मम्मीसाहेब’ ही भूमिका साकारताना दिसत आहेत.

मालिकेच्या सुरुवातीपासून आपण पाहिलं आहे की मम्मीसाहेब नेहमी मंजूने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा गैरसमज करतात.आता येणाऱ्या भागात प्रेक्षकांना नवीन वळणं पाहायला मिळणार आहेत. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे मम्मीसाहेब सत्या - मंजूला घराबाहेर काढते पण तात्यासाहेब दोघांना घरी घेऊन जातात.सत्या आणि मंजू तात्यासाहेच्या घरी गेल्यामुळे मम्मीला दोघांना परत घरी आण्यासाठी जाणं भाग पडतं. मम्मीसाहेब त्यात्यासाहेबांसमोर स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी सत्या - मंजूला परत आणायला जातात. पण तात्या मम्मीला सगळ्यांसमोर माफी मागायला सांगतात. हे ऐकून मम्मीला धक्का बसतो. आता मम्मी मंजूची माफी मागेल का? सत्या आणि मंजू घरी परत येतील का की तात्यासाहेबांच्या घरात वेगळाच खेळ रंगणार? हे वळण लवकरच तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर येत्या आठवड्यातील भाग पाहायला विसरू नका .

'कॉन्स्टेबल मंजू' सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वाजता सन मराठीवर पाहा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news