Oliver Tree Death : हेलिकॉप्टर अपघातात प्रसिद्ध गायक ऑलिव्हर ट्रीसह सहा जणांचा मृत्यू

Oliver Tree Death : रिओ डी जनेरियोमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची धडक, जागतिक दौऱ्यावर असतानाच काळाचा घाला
Oliver Tree Death
ऑलिव्हर ट्री.Pudhari
Published on
Updated on

Oliver Tree Death : रिओ डी जनेरियो येथे दोन हेलिकॉप्टर्सची परस्परांना भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये प्रसिद्ध अमेरिकन गायक ऑलिव्हर ट्री (३२) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे जागतिक संगीत क्षेत्रास ऑलिव्‍हर ट्री यांच्‍या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

अनोखे सादरीकरणामुळे ऑलिव्‍हर यांची वेगळी ओळख

ऑलिव्हर ट्री हे त्यांच्या 'एलियन बॉय' आणि 'लाइफ गोज ऑन' या जगभरात व्हायरल झालेल्या गाण्यांसाठी विशेष लोकप्रिय होते. त्यांच्या अनोख्या सादरीकरणामुळे आणि विनोदी शैलीमुळे त्यांनी तरुण वर्गात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्‍यांच्‍या अकाली एक्‍झिटने चाहत्‍यांना मोठा धक्‍का बसला आहे. स्थानिक प्रशासनाकडून हेलिकॉप्टर अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

Oliver Tree Death
Delhi Restaurant Fire: दिल्लीतील रेस्टॉरंटला भीषण आग; 21 जणांचा होरपळून मृत्यू, जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून मारल्या उड्या

अपघातापूर्वी केला होता फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ पोस्ट

रिपोर्टनुसार, ऑलिव्हर ट्री यांनी नुकताच ४ जून रोजी ब्युनोस आयर्स येथे एक शानदार कार्यक्रम सादर केला होता. अपघाताच्या काही तास आधी, म्हणजेच शनिवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्‍ये ते ब्राझीलमधील एका भागात स्थानिक लोकांसोबत फुटबॉल खेळताना दिसत होते. हा त्यांचा अखेरचा व्हिडिओ ठरल्याने चाहत्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

Oliver Tree Death
Punjabi Singer Rajvir Jawanda Dies | पंजाबी गायक राजवीर जवांदाचे निधन, ११ दिवस रुग्णालयात सुरू होती झुंज...

मृतात प्रसिद्ध यूट्यूब क्रिएटर गॅस्पर प्रिम डायझ यांचाही समावेश

या भीषण अपघातात अर्जेंटिनातील 'ब्लेंडर' या प्रसिद्ध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे यूट्यूब क्रिएटर गॅस्पर प्रिम डायझ यांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. सोशल मीडिया विश्वात 'गॅस्पी' (Gaspi) या नावाने लोकप्रिय असलेले डायझ हे अवघ्या २३ वर्षांचे होते आणि यूट्यूबवर त्यांचे २८ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.

Oliver Tree Death
Dhule Surat ST Bus Accident: गुजरात सीमेवर एसटी बसचा भीषण अपघात, 7 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

धडकेनंतर पार्किंग लॉटमध्ये लागली भीषण आग

स्थानिक अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, हवेत दोन हेलिकॉप्टर्स परस्परांना धडकल्यानंतर त्यातील एक हेलिकॉप्टर थेट एका पार्किंग लॉटमध्ये कोसळले. यामुळे तिथे उभ्या असलेल्या अनेक इलेक्ट्रिक वाहनांनी (EVs) पेट घेतला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्परतेने आग आटोक्यात आणली. दोन्ही हेलिकॉप्टर्सची ही धडक नेमकी कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा चुकीमुळे झाली, याचा सखोल तपास सुरू असल्याचे विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा होता ऑलिव्हर ट्री यांचा सांगीतिक प्रवास

कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेल्या ऑलिव्हर ट्री सॅन फ्रांसिस्को आणि 'बे एरिया' मधील अनेक ठिकाणच्या सादरीकरणामुळे प्रकाशझोतात आले. २०१३ मध्ये त्यांनी 'R&S रेकॉर्ड्स'च्या माध्यमातून 'डेमन्स' हा आपला पहिला मिनी अल्बम (त्यानंतर २०१६ मध्ये प्रसिद्ध संगीतकार 'वेथन' यांच्या 'व्हेन आय एम डाऊन' या गाण्यासाठी केलेल्या सहकार्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली. या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी जगप्रसिद्ध 'अटलांटिक रेकॉर्ड्स'सोबत करार केला आणि 'वेलकम टू एलए' हा अल्बम बाजारात आणला.

ऑलिव्हर ट्री अनोख्‍या फॅशनमुळे तरुणाईत प्रचंड लोकप्रिय

अनोखी फॅशन आणि स्टाईल: ऑलिव्हर ट्री हे केवळ त्यांच्या संगीतासाठीच नाही, तर त्यांच्या खास 'बाऊल-कट' हेअरस्टाईल, रेट्रो फॅशन आणि स्टेजवरील अनोख्या विनोदी सादरीकरणासाठी जगभरातील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते.२०१८ मध्ये आलेल्या 'एलियन बॉय' (Alien Boy) आणि त्यानंतरच्या 'ऑल दॅट x एलियन बॉय' या ईपीला जगभरातील रसिकांनी डोक्यावर घेतले होते.

Oliver Tree Death
Bihar Hospital Fire: आयसीयूमध्ये अग्नीतांडव... तब्बल १० रूग्णांचा जळून मृत्यू झाल्याची भीती

जागतिक दौऱ्यावर असतानाच काळाचा घाला

ट्री हे त्यांच्या चौथ्या अल्बमच्या प्रसिद्धीसाठी 'जागतिक दौऱ्यावर' होते. या दौऱ्याची सुरुवात नुकतीच ३० मे रोजी मेक्सिको सिटी येथून झाली होती. या दौऱ्यांतर्गत ते अनेक देशांमध्ये संगीत कार्यक्रम करणार होते, मात्र त्यापूर्वीच काळाने त्‍यांच्‍यावर घाला घातल्‍याने त्‍यांच्‍या चाहत्‍यांना मोठा धक्‍का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news