O’Romeo Tripti Dimri Look |'अफशासाठी प्रेम म्हणजे अभिशाप..' तृप्तीचा सिंपल पण नजरेत भरणारा लूक रिलीज

O’Romeo Tripti Dimri Look |'प्रेम हा अफशानवर पडलेला शाप आहे', तृप्तीचा सिंपल पण नजरेत भरणारा लूक रिलीज
tripti dimri shahid kapoor
O’Romeo Tripti Dimri Look released instagram
Published on
Updated on
Summary

O’Romeo मधील तृप्ती दिमरीचा नवीन लूक रिलीज झाला असून तो साधा असला तरी भावनिक आणि नजरेत भरणारा आहे. ‘प्रेम हा अफशानवर पडलेला शाप आहे’ या संवादामुळे तिच्या व्यक्तिरेखेची वेदना आणि खोली अधिक ठळकपणे समोर येत आहे.

Tripti dimri new look from o romeo film

ओ’रोमिओ हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरतोय. विशाल भारद्वाज दिग्दर्शित रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपटातील तृप्ती डिमरीचा नवा लूक व्हायरल होतोय. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटने इन्स्टाग्राम हँडलवर तृप्तीचा नवा लूक शेअर केला आहे.

tripti dimri shahid kapoor
Ramayana | ‘आता अफवा थांबवा!’ राघव जुयालच्या रिप्लेसमेंटवर विक्रांत मेस्सीने अखेर सोडले मौन

यामध्ये अभिनेत्री तृप्तीने ब्लॅक कलर दुपट्टा डोक्यावर ओढलेला दिसतो. खूप कमी सिंपल लूकमध्ये ती लक्षवेधी ठरलीय. फोटो शेयर करत निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, “मोहब्बत एक बद्दुआ है जो अफशां को लगी है…. साजिद नाडियाडवाला प्रस्तुत करते हैं विशाल भारद्वाज की फिल्म ‘ओ रोमियो’ इस शुक्रवार सिनेमाघरों में.”

तृप्तीने इन्स्टाग्रामवर लिहिलंय- 'ती मनापासून भावना व्यक्त करते आणि तीव्रतेने संघर्ष करते.... ४ दिवसांनी अफशानला भेटा'. हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत रिलीज होणार आहे. विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर यांचा हा चौथा चित्रपट आहे. या जोडीने आधी 'हैदर' आणि 'कमीने' चित्रपट एकत्र केले आहेत.

tripti dimri shahid kapoor
Bigg Boss Marathi 6 | बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच दिव्या शिंदेची पहिली पोस्ट व्हायरल, म्हणाली- 'शांत राहा..नकारात्मकता..'

ओ’रोमिओचे बजेट

रिपोर्टनुसार, ओ’रोमिओ हा चित्रपट १५० कोटी ते २०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

ओ’रोमिओ कास्ट फी

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटातील कलाकारांनी इतके मानधन घेतले आहे.

शाहिद कपूर- ४५ कोटी रुपये (भूमिका - उस्तारा)

अविनाश तिवारी - ७ कोटी रुपये (भूमिका - जलाल)

तृप्ती डिमरी - ६ कोटी रुपये (भूमिका - अफशा)

तमन्ना भाटिया - ७ कोटी रुपये (भूमिका - रबिया)

दिशा पटानी - २ कोटी रुपये (भूमिका - जुलिया)

नाना पाटेकर - ४ कोटी रुपये (भूमिका - इस्माईल खान)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news