New Movie | विनीत कुमार सिंहचे बर्थडे गिफ्ट, सनी देओल-स्टार 'SDGM' चित्रपटात

विनीत कुमार सिंह दिसणार सनी देओल-स्टार 'SDGM' चित्रपटात
happy birthday Actor Vineet Kumar Singh
विनीत कुमार सिंह नव्या चित्रपटात दिसणार आहे instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेता विनीत कुमार सिंह आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. 'मुक्काबाज' अभिनेत्याने 'SDGM' नावाचा बहु-भाषिक पॅन इंडिया चित्रपट साईन केला आहे! ज्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Mythri Movie Makers आणि पीपल मीडिया फॅक्टर द्वारे निर्मित हा चित्रपट विनीतचा सनी देओलसोबतचा पहिला प्रोजेक्ट असणार आहे.

अहवालानुसार, मोठ्या बजेटचा चित्रपट "देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट" म्हणून ओळखला जाणार असून तो गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित करणार आहे.

हे दोन्ही कलाकार वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजते. यापूर्वी निर्मात्यांनी रणदीप हुड्डाला चित्रपटाचा भाग म्हणून घोषित केले होते. ऋषी पंजाबी हे सिनेमॅटोग्राफी सांभाळतील तर संगीत थमन एस सैयामी खेर यांनी दिले आहे आणि रेजिना कॅसँड्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, विनीत कुमार सिंहला त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'घुसपैठिया' मधील कामगिरीबद्दल प्रशंसा मिळत आहे. सध्या तो 'सुपरबॉय ऑफ मालेगाव', 'रंगीन' आणि 'छावा' या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या रिलीजची तयारी करत आहे.

happy birthday Actor Vineet Kumar Singh
Stree 2 | अपारशक्ती खुराणाने 'सॉफ्ट चिट्टी वॉर्म चिट्टी' लोरीचा व्हिडिओ केला शेअर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news