New Movie | या दिवशी प्रदर्शित होणार 'वहिवाट" चित्रपट

या दिवशी प्रदर्शित होणार 'वहिवाट" चित्रपट
New Movie
या दिवशी प्रदर्शित होणार 'वहिवाट" चित्रपटInstagram
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'श्री व्हिजन प्रोडक्शन निर्मित 'वहिवाट' हा मराठी चित्रपट ७ फेब्रुवारी, २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक डॉ. संजय तोडकर यांनी एका छोट्याशा आदिवासी पाड्‌यावर घडणाऱ्या घटनेचा विषय कुशलतेने हाताळलाय. आजच्या काळात "विकास" म्हटलं की "पर्यावरणाचा ऱ्हास" हे गृहीत धरायचं. प्रगतीच्या वाटेवर चाललोय असे समजून आपण खरं तर विनाशाकडे चाललोय... पण एक समाज म्हणून त्याची जाणीव आपल्याला अजिबात नाही. ती व्हायला हवी... हा चित्रपट ती जाणीव करून देतो.

चित्रपटात राज वरक, प्रणवी पाटील, रुकैया शिलेदार, एन डी कार्वेकर, तनुजा कदम, अमृत सावंत, भक्ती गोमई, संजय टिपुगडे व राज पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा व संवाद कै. विजय शंकर पवार यांचे असून पटकथा लेखन पल्लवी अशोक जोशी यानी केले आहे. चित्रपटाचे देखणे छायांकन जयदीप निगवेकर, संगीत - पार्श्वसंगीत चंद्रशेखर जनवाडे व रवींद्र चांदेकर यांनी तर कार्यकारी निर्माता म्हणून खुदाबक्ष जमादार व पल्लवी तोडकर यानी काम पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.