

पुढारी ऑनलाईन डेस्क - महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात थोर आणि महान संतांनी जन्म घेतला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर होत असलेल्या भक्तिरसपूर्ण, कथारूप, एकपात्री निवेदनाला कीर्तन असं म्हणतात आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. कीर्तनाची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे आणि असेच हजारो कीर्तनकार महाराष्ट्रात कीर्तन परंपरा जपण्यासाठी कीर्तन शिकत आहेत. आता सोनी मराठी वाहिनी एक नवा कार्यक्रम ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ घेऊन येत आहे.
१२ वर्षं आणि त्यापेक्षा अधिक वय असलेले स्पर्धक कार्यक्रमात आपले कौशल्य दाखवणार आहेत. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.