

Actor Govinda in new Look:
बॉलीवूडचा हीरो नंबर वन गोविंदा एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या समोर आला आहे. बराच काळ मोठ्या पडद्यापासून लांब असलेला गोविंदा यांनी अचानक नवीन लुकमधील फोटो शेयर केला आणि नेटकरी एकदम फॉर्मात आले. हा लूक शेयर करताच त्यावर संमिश्र कमेंट येऊ लागल्या. गोविंदाचा नवा लूक थोडा हटके आहे. सूट, काळा चश्मा आणि पातळ मिशीने वेगळाच दिसतो आहे. तो हँडसम दिसत असला तरी या फोटोला असलेले बॅकग्राऊंड मात्र अत्यंत खराब आहे.
या फोटोवर कमेंट करताना नेटकरी म्हणतात, 'तुम्ही कायमच हीरो नंबर वन आहात'. तर एकजण म्हणतो, वय, इगो आणि भूमिकेची लांबी बाजूला ठेवा आणि कमबॅक करा. तर दुसरी कमेंट अशी आहे की 'याची बायको बरोबर बोलते आहे हा 90s च्या पुढे जाउच शकत नाही. तर दूसरा म्हणतो, नसीब सिनेमाचा पार्ट 2 येतो आहे वाटते.
तर एकजण म्हणतो, तुम्ही अगदी रजा मुराद दिसत आहात. तर एकजण त्याला सर तुम्ही राज कपूर का बनला आहात असे विचारले आहे.
गोविंदा मागील काही काळापासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. पत्नी सुनीतासोबत घटस्फोटाच्या बातम्यांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सगळे काही आलबेल नसल्याचे समोर आले होते. गोविंदाला मोठ्या पडद्यावर शेवटचे 2019 मध्ये रंगीला राजा या सिनेमात पाहिले गेले होते. त्यानंतर गोविंदा कमबॅक कधी करणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. यानंतर गोविंदाने सलग तीन सिनेमे अनाऊंन्स केले होते. त्यापैकी बाए हाथ का खेल आणि पिंकी डार्लिंग असे या दोन सिनेमांची नावे आहेत तर तिसऱ्या सिनेमाचे नाव अजून जाहीर झालेले नाही.