

पुढारी ऑनलाईन डेस्क - मेलबर्नच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तब्बल ३ तास उशीरा पोहोचल्याने प्रतीक्षा करत असलेले प्रेक्षक चांगलेच संतापले. रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये ती स्टेजवर रडताना दिसतेय. आणि प्रेक्षकांना प्रतीक्षा करण्यासाठी धन्यवाद देताना दिसतेय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लाईव ऑडियन्स देखील नेहा कक्कड रडताना पाहून तिची खिल्ली उडवताना दिसत आहे. सोशल मीडियावर ट्रोल्स देखील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये नेहा म्हणताना दिसते की, मित्रांनो तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही धैर्य ठेवलं. इतकी वेळ तुम्ही प्रतीक्षा करत आहात. मी माझ्या आयुष्यात कुणालाही इतकी प्रतीक्षा करायला लावली नाही. मला माफ करा, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी ही संध्यकाळ नेहमी आठवणीत ठेवेन. आज तुम्ही लोक माझ्यासाठी इतका किमती वेळ काढून आला. मी वचन देते की, मी तुम्हाला डान्स करायला भाग पाडेन.
काही लाईव्ह ऑडियन्स रागाच्या भरात म्हणताना दिसत आहे...परत जा. हॉटेलमध्ये आराम करा. दुसरा व्यक्ती म्हणतो, ..तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आहात. आम्ही ३ तास वाट पाहिली. आणखी एक जण म्हणतो, खूप चांगला अभिनय आहे. हे इंडियन आयडल नाही. तुम्ही मुलांसोबत परफॉर्म करत नाहीये.