Nayanthara Toxic First look | हातात बंदूक घेऊन डॅशिंग अवतारात नयनतारा, यशने शेअर केला 'टॉक्सिक'मधील फर्स्ट लूक

Nayanthara Toxic First look - 'जवान'ची अभिनेत्री नयनताराचा लूक, यशने शेअर केले पोस्टर
Nayanthara
Nayanthara Toxic First look released x account
Published on
Updated on
Summary

‘टॉक्सिक’ चित्रपटातून नयनताराचा दमदार फर्स्ट लूक समोर आला असून हातात बंदूक घेऊन दिसणाऱ्या तिच्या पॉवरफुल अवताराने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. हा लूक यशने शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Nayanthara First look From Toxic out

टॉक्सिक चित्रपटातील पोस्टरमधील साऊथ अभिनेत्री नयनताराच्या डॅशिंग लूकची चर्चा होतेय. बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टॉक्सिक’मधील तिचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून या लूकने सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. कारण शाहरुख सोबत 'जवान'मध्ये काम केल्यानंतर पुन्हा एकदा नयताराचा स्वॅग पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे हा फर्स्ट लूक अभिनेता यशने स्वतः एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.

Nayanthara
'ग्लॅमरपासून दूर'...Mouni Roy चा Holiday Time! मस्ती-मूड अन् एन्जॉय जंगल ट्रेक

समोर आलेल्या पोस्टरमध्ये नयनतारा हातात बंदूक घेतलेल्या डॅशिंग आणि पॉवरफुल अवतारात दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, भेदक नजर पाहता तिची ही भूमिका अत्यंत गंभीर, ॲक्शन-पॅक असल्याचे समजते. आतापर्यंत सॉफ्ट, इमोशनल आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जाणारी नयनतारा आता ‘टॉक्सिक’मध्ये पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.

कधी रिलीज होणार टॉक्सिक?

२०२६ मध्ये ईदच्या निमित्ताने हा चित्रपट रिलीज केला जाईल. अनेक स्टार्स चित्रपटात दिसणार आहेत. टॉक्सिक पुढील वर्षांतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असून यामद्ये नयनतारा गंगाच्या भूमिकेत असेल.

Nayanthara
TV Actress Nandini CM end of life | 'स्वप्ने अपूर्णच राहिली!' २६ वर्षीय अभिनेत्रीने संपवले जीवन, नोटमध्ये लिहिलं...'

नयनताराने आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार महिला पात्र साकारली आहेत. ती केवळ अभिनेत्री नाही तर स्वतःच्या जोरावर चित्रपट चालवणारी स्टार म्हणूनही दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. ‘टॉक्सिक’मधील तिची भूमिका देखील तितकीच प्रभावी असणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘टॉक्सिक’मधील नयनताराचा हा बंदूकधारी लूक पाहता धाडसी भूमिका तिच्या करिअरला चारचाँद लावतील, असे चाहते म्हणत आहेत. सध्या सोशल मीडियावर यशने शेअर केलेला हा फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता फॅन्सना लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news