

पुढारी ऑनलाईन डेस्क - नयनतारा आणि धनुष यांच्यामध्ये चाललेल्या केसमध्ये धनुषने लढाई जिंकली आहे. नयनताराने आपल्या डॉक्युमेंट्रीसाठी धनुषच्या चित्रपटातील क्लिप वापरली होती. त्यानंतर धनुषने कॉपीराईट अॅक्टच्या अंतर्गत कोर्टात याचिका दाखल करुन नुकसान भरपाईची मागणी केली होती. आता कोर्टाने नेटफ्लिक्सची याचिका फेटाळली असून धनुषच्या बाजूने निकाल लागला आहे. धनुष ही केस जिंकल्याने नेटफ्लिक्स इंडियाला तब्बल १० कोटींची भरपाई द्यावी लागणार आहे.
धनुषच्या परवानगीशिवाय नयनतारा आणि नेटफ्लिक्सने धनुषच्या सिनेमातील ३ सेकंदाची ही क्लिप वापरली होती. धनुषने इशारा देऊनही नयनताराने क्लिप हटवली नव्हती. नेटफ्लिक्स आणि नयनताराने डॉक्युमेंट्रीमध्ये कोणताही बदल न केल्याने धनुषने कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणात धनुषने केस जिंकली असून आता भरपाई द्यावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे प्रकरण नेटफ्लिक्सचा डॉक्यु-ड्रामा ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल’ मध्ये तमिळ चित्रपट ‘नानुम राउडी धान’मधील एका सीनशी संबंधित होते. या चित्रपटातील ३ सेकंदाची क्लिप विना परवानगी नयनताराने आपल्या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरली होती. इशारा देऊनही नयनताराने ती क्लिप न हटवल्याने धनुषने कोर्टाची पायरी चढली. कोर्टाने कॉपीराईट प्रकरणात नेटफ्लिक्स इंडियाची याचिका फेटाळली.
धनुषने नोव्हेंबर, २०२४ मध्ये नयनतारा, तिचा पती विग्नेश शिवन आणि त्यांचे प्रोडक्शन हाऊस राउडी पिक्चर्स विरोधात मद्रास उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.