Navra Maaza Navsaacha 2 | 'या' गाण्याचे रिक्रिएशन 'नवरा माझा नवसाचा २' मध्ये

'नवरा माझा नवसाचा २' मधील नवे गाणे लवकरचं भेटीला
Navra Maaza Navsaacha 2 song
नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटातील नवे गाणे लवकरचं रिलीज होत आहेSachin Pilgaonkar Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वश्रुत असलेले गणपती बाप्पाचे "डम डम डम डम डमरू वाजे...." हे गाजलेलं गाणे "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. (Navra Maaza Navsaacha 2 )

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटाची निर्मिती, कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.

"डम डम डम डम डमरू वाजे" या रिक्रिएट केलेल्या गाण्याचं गीतलेखन प्रवीण दवणे यांनी केले आहे. संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केले आहे.

"देवा तुझ्या गाभाऱ्याला" या गाण्यापासूनच मी आदर्श शिंदेच्या आवाजाचा मी फॅन झालो होतो. मी त्याला माझ्या मुलासारखा मानू लागण्याइतके आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येऊ असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याच्याबरोबर कधी एकत्र गाता येईल हेही माहित नव्हतं. आदर्शने अत्यंत आपुलकीने हे गाणे माझ्याबरोबर गायले आहे. या गाण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याला हवं त्या पद्धतीने या गाण्यावर काम केलं आहे. त्यामुळे हे गाणे नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल.

रविराज कोलथरकर या तरुण संगीतकाराचं "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटातून पदार्पण होत आहे. अतिशय गुणी असा हा कलाकार आहे, अशी भावना सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली.

गाण्याविषयी आदर्श शिंदे म्हणाला की, "डम डम डम डम डमरू वाजे" हे गाणं मी लहानपणापासून ऐकत, गात आलो आहे. आता "नवरा माझा नवसाचा २" या चित्रपटात सचिन पिळगावकर यांच्यासह ते मला गायला मिळणं ही खूप आनंदाची बाब आहे. आम्ही दोघांनी एकाचवेळी एकत्र उभे राहून हे गाणं गाण्याचा वेगळा प्रयोग केला. त्यामुळे पूर्वीच्या काळी जसं रेकॉर्डिंग व्हायचं तसं हे गाणं केलं आहे. तो अनुभव खूप कमाल होता. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे नक्कीच गाजेल, अशी मला आशा असल्याचे गायक आदर्श शिंदे याने सांगितले.

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पावरची अनेक गाणी येत असतात. मात्र यंदाचा गणेशोत्सव "डम डम डम डम डमरू वाजे" या गाण्यामुळे अधिकचं स्पेशल होणार आहे. प्रत्येक घरात, मंडळात हे गाणं वाजेल यात शंका नाही. "नवरा माझा नवसाचा २" हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news