

‘अखंडा २’ चित्रपटाची रिलीज डेट कायदेशीर कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत प्रेक्षकांची माफी मागितली आहे. कागदपत्रीय पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नवीन रिलीज डेट जाहीर केली जाईल.
नंदमुरी बालकृष्णचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अखंडा २’ हा प्रेक्षकांसाठी मोठा सिनेमॅटिक मेजवानी ठरणार होता. परंतु रिलीजपूर्वीच या चित्रपटाला अनपेक्षित कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ठरलेली रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. ज्यामुळे फॅन्स अवाक झाले.
‘अखंडा’च्या पहिल्या भागाने जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने विक्रमी कमाई केली होती. त्यामुळेच ‘अखंडा २’बद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाशी संबंधित काही कागदपत्रीय आणि हक्कांशी निगडित कायदेशीर पडताळणी अद्याप प्रलंबित असल्याचे म्हटले जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित करणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चित्रपटाबाबत नेमकं काय घडलं?
तर तांत्रिकी कारणांमुळे एक दिवस आधी प्रीमियर्स कॅन्सल करण्यात आले आहेत. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी करत फॅन्सशी माफी मागितली आहे. त्यांचं म्हणणं आहे की , ते लवकरच नव्या तारखेची घोषणा करतील.
गुरुवारी सायंकाळी प्रोडक्शन हाऊस १४ रील्स प्लसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्टेटमेंट जारी करत म्हटलं की, तांत्रिक समस्यांच्या कारणांनी चित्रपटाचे पेड प्रीमियर्स कॅन्सल करण्यात आले आहेत. त्यांनी म्हटलंय- "आज होणारा अखंड २ चा प्रीमियर तांत्रिक अडचणींमुळे रद्द करण्यात आला आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले, परंतु काही घटक आमच्या नियंत्रणाबाहेर होते. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत."
निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, "जड अंतःकरणाने, आम्हाला तुम्हाला कळवण्यास दुःख होत आहे की 'अखंड २' अपरिहार्य परिस्थितीमुळे वेळापत्रकानुसार प्रदर्शित होणार नाही."
मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पोस्टपोन करण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर घेण्यात आला आहे. हे प्रकरण इरॉसच्या बाजूने गेलेल्या पूर्वीच्या लवादाच्या निर्णयामुळे सुरू असलेल्या दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादातून उद्भवले आहे, आणि कंपनीला अंदाजे २८ कोटी रुपयांसोबत १४ टक्के व्याज मिळण्याचा हक्क मिळणार होता. कोर्टाने निर्देश दिले की, थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय 'अखंड २' चित्रपटगृहांमध्ये, डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा सॅटेलाइट ब्रॉडकास्टद्वारे प्रदर्शित करता येणार नाही. इरॉसने असाही दावा केला की, '१४ रील्स प्लस एलएलपी' हा मुळात '१४ रील्स एंटरटेनमेंट'चाच एक भाग आहे आणि थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय रिलीजला परवानगी दिल्याने प्रमोटर्सना त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या टाळताना नफा मिळवण्याची संधी मिळेल.
तथापि, रिलीजला आलेला हा अडथळा तात्पुरता असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच चित्रपट नवीन तारखेसह प्रेक्षकांसमोर येईल. त्यामुळे ‘अखंडा’ चाहत्यांनी आणखी थोडे संयम ठेवण्याची गरज आहे.