पुढारी ऑनलाईन डेस्क - दिग्दर्शक नागराज मंजुळेंना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे समन्स बजावले आहे. खाशाबा चित्रपटाच्या कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना समन्स बजावल्याचे समजते. खाशाबा चित्रपट स्क्रिप्ट वाद असल्याचे वृत्त समोर आले आहे.
आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट खाशाबाचे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा केली होती. दिग्दर्शक नागराज मंजुळे या बायोपिकचे दिग्दर्शन करत आहेत. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे ऐतिहासिक पदक जिंकणाऱ्या आणि स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
नागराज मंजुळेंचा सैराटनंतर तिसरा मराठी फिल्म आहे. मागच्या तीन वर्षांपासून ते 'खाशाबा'ची तयारी करत आहेत. 'खाशाबा' २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.