Samantha Prabhu : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर सामंथा लग्नासाठी तयार?

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर सामंथा लग्नासाठी तयार?; असं केलं प्रपोज...
Samantha Ruth Prabhu
Samantha Prabhu : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर सामंथा लग्नासाठी तयार? Samantha Ruth Prabhu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार नागा चैतन्यने काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत साखरपुढा केला. यानंतर नागा चैतन्यची पहिली पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, सामंथाने कोणतेही अध्याप माहिती दिली नाही. दरम्यान एका फॅन्सने सोशल मीडियावरून सामंथाला प्रपोज केलं आहे. यावर सांमथाने त्याच्या प्रपोजल स्विकारत त्याला हटके उत्तर दिले आहे. यामुळे सामंथाही पुन्हा लग्न करणार आहे? याची जोरदार चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू गेल्या काही वर्षांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यात कठिण टप्प्यातून जात आहेत. तिने २०१७ मध्ये नागा चैतन्यशी लग्न केले, परंतु, २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सामंथा आणि नागा चैतन्य यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होतं. यानंतर सामंथाला आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, तिने प्रत्येक अडचणीचा सामना केला. दरम्यान सामंथाचा पहिला पती नागा चैतन्यने घटस्फोटानंतर गर्लफ्रेंड शोभिता धुलिपालासोबत साखरपुढा केला. यानंतर सामंथाची काळजी करत चाहत्यांनी तिला खूपच प्रेम आणि प्रोत्साहन दिले आहे.

याच दरम्यान सामंथाच्या एका फॅन्सचा तिला लग्नासाठी प्रपोज करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये एक फॅन सामंथाला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो आणि तिच्याशी लग्न करण्याची विनंती करतो. याशिवाय तो आपली बॅग पॅक करून समांथाच्या घरी जाण्यासाठी निघून जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी माझी बॅग पॅक करत आहे आणि समांथाच्या घराकडे जात आहे. त्यांना हे सांगण्यासाठी की, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण, मी नेहमीच त्यांच्यासोबत आहे. मी लग्नासाठी तयार आहे, मला फक्त २ वर्ष द्या. म्हणजे, मी कमाई करू शकतो.' या व्हिडिओ कोठला आहे हे माहित नाही. मात्र, व्हिडिओच्या पाठीमागे व्यायाम शाळा दिसत आहे.

या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सामंथाने गमंतीने होकार देत पोस्टला हटके उत्तर दिलं आहे. यात तिने लिहिलं आहे की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी भारावून गेले. या व्हिडिओच्या पाठिमागे जीम दिसत असल्याने मी प्रपोजला होकार देत आहे. मला खात्री पटली आहे.' यावरून सामंथा पुन्हा एकदा लग्नासाठी तयार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांची ८ ऑगस्टला साखरपुढा पार पडला होता. याविषयीची माहिती नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी दिली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सामंथा आगामी 'सिटाडेल: हनी बनी' या थ्रिलरमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता वरुण धवन भूमिका साकारणार आहे.

Samantha Ruth Prabhu
Samantha Prabhu : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर सामंथाचा आनंद

( video : mooookesh instagram वरून साभार)

admin

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news