Samantha Prabhu : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर सामंथाचा आनंद

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर सामंथाची पोस्ट चर्चेत
Samantha Ruth Prabhu
नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर सामंथाची पोस्टSamantha Ruth Prabhu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) आणि अभिनेता नागा चैतन्यच्या घटस्फोटानंतर नागा नव्याने लग्नाच्या बेडीत अडकत आहे. नागा चैतन्यने काल अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत धुमधडाक्यात साखरपुढा केला आहे. या साखरपुढ्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर त्याच्यावर बॉलिवूड आणि साऊथ कलाकरांकडून शुभेच्छाचा वर्षाव होवू लागलाय. याच दरम्यान नागाची पहिली पत्नी सामंथा प्रभूच्या सोशल मीडियावर पोस्टकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आता सांमथाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आनंद साजरा केला आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर विनेश फोगटच्या कुस्तीतून निवृत्तीचे वृत्त शेअर केले आहे. या पोस्टसोबत सांमथाने एक हार्टब्रोक इमोटिकॉन ईमोजीही शेअर केला आहे. या पोस्टच्या काही तासांनंतर सामंथाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाच्या विजयाचा आनंद साजरा करणारी पोस्ट शेअर केली. या दोन्ही पोस्टमध्ये सामंथा तिच्या पहिल्या पती नागा चैतन्यच्या साखरपुढा आणि लग्नाबद्दल काहीच बोललेली दिसत नाही. मात्र, ती भारताचा हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकल्याने आनंद व्यक्त करत आहे.

admin

अभिनेता नागा चैतन्य शोभिता धुलिपालासोबत कुटुंबीय आणि खास मित्रांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. दरम्यान काल झाल्याने साखरपुढ्याचे दोन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर त्याच्यावर चाहत्यासह बॉलिवूड स्टारस्कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पहिल्या फोटोत मुलगा, नागा चैतन्य आणि शोभिता दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सुपरस्टार नागा आणि शोभिता दोघेजण सुंदर दिसत आहेत.

admin

नागा चैतन्यने ऑक्टोबर २०१७ मध्ये सामंथासोबत लग्न केले होते. यानंतर चार वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर आता नागा चैतन्य दुसरं लग्न करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news