MithyaNewSeason
हुमा कुरेशी-अवंतिका दासानी ‘मिथ्या’ सीझन २ साठी सज्ज! instagram

‘मिथ्या’ सीझन २ ची घोषणा : भरगच्च नाट्य, थरार आणि वळण

Mithya New Season | हुमा कुरेशी-अवंतिका दासानी ‘मिथ्या’ सीझन २ साठी सज्ज!
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क - रोझ ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्शनच्या सहकार्याने अप्लॉज एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, मिथ्याच्या या सीझनचे दिग्दर्शन कपिल शर्माने केले आहे. नवोदित कलाकार नवीन कस्तुरिया यांची भर पडली आहे.

झी ५ ने दुसऱ्या सीझनसाठी मानसशास्त्र विषयावरील नाट्य 'मिथ्या' परतणार असल्याची घोषणा केली. ही मालिका महत्त्वाकांक्षा, विश्वासघात आणि सूड भावनेने पछाडलेल्या दोन सावत्र बहिणींमधील अशांत नात्याभोवती फिरते. मिथ्याच्या दुसऱ्या सीझनमध्ये रजित कपूर आणि इंद्रनील सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिकांसह सावत्र बहिणी साकारणाऱ्या हुमा कुरेशी आणि अवंतिका दासानी झळकणार आहेत. या नव्याकोऱ्या सीझनमध्ये नवीन कस्तुरिया दिसणार असून, तो या दोन बहिणींच्या जीवनाला अधिक मसालेदार करणारी एक रहस्यमय व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.

निर्माते गोल्डी बहल म्हणाले, "मिथ्या’चा सीझन २ पुन्हा सादर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ही मालिका नेहमीच सत्य, फसवणूक आणि मानवी मनाच्या धूसर कप्प्यांचा शोध घेणारी आहे. पहिल्या सीझनला मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय होता.''

दिग्दर्शक कपिल शर्मा म्हणाला, "आम्ही आमच्या प्रेक्षकांना नवीन सीझनकडे वळवण्यासाठी पूर्णपणे उत्साही आहोत. हा सीझन केवळ कथानकांमुळेच समृद्ध नसून नेत्रदीपक देखील आहे. चित्तथरारक दार्जिलिंगवर आधारित,कथानकाची तीव्रता उंचावणारी दृश्ये आणि थरारासह प्रतिभावान कलाकारांच्या काही अद्भुत कामगिरी टिपल्या आहेत. 'मिथ्या' च्या पुनरागमनाची चर्चा प्रचंड आहे. आमच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा एक पायरी वर नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news