प्रशांत दामलेंचा ‘मु. पो. बोंबीलवाडी’ चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Mukkam Post Bombilvadi | ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या दिवशी होणार रिलीज
Mukkam Post Bombilvadi movie
‘मु. पो. बोंबीलवाडी’ या दिवशी रिलीज होणार आहे Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - विवेक फिल्म्स, मयसभा करमणूक मंडळीकृत परेश मोकाशीलिखित-दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी व दिलीप शितोळेनिर्मित ‘मु. पो. बोंबीलवाडी’चा ट्रेलर आज मुंबईत येथे प्रदर्शित करण्यात आला. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ १ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात धमाल विनोदाने होणार आहे. विवेक फिल्म्स् आणि मयसभा करमणूक मंडळीकृत ‘मु. पो. बोंबीलवाडी’ची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, भरत दिलीप शितोळे यांची असून लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे. पटकथा आणि संवाद परेश मोकाशी यांनीच लिहिले आहेत. संगीत आणि पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांचे आहे.

प्रशांत दामले हे चित्रपटात हिटलरच्या तर आनंद इंगळे चर्चिलच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपटात तगडी स्टारकास्ट असल्यानेही प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. त्यातच ट्रेलरमध्ये अनेक गमतीशीर प्रसंग समोर येतात. हिटलरच्या भूमिकेतील प्रशांत दामले आणि इतरांच्या तोंडी धमाल संवाद आहेत आणि त्याची झलक या ट्रेलरमध्ये दिसते.

दाढी करत असलेला हिटलर ती करणाऱ्याशी जर्मनमध्ये बोलतो, तर पार्श्वभूमीवर आवाज येतो, “परदेशी पात्रेही आता मराठीत बोलतील.” हिटलर म्हणतो, “माझ्या डिक्शनरीत प्रोब्लेम हा वर्ड नाही.” त्यावर पुन्हा आवाज येतो, “शुद्ध मराठीत!” दुसऱ्या फ्रेममध्ये चर्चिल स्वतःचे नाव घेतो, तर त्यालाही शुद्ध मराठीत बोलण्याच्या सूचना दिल्या जातात. “विन्स्टन चर्चिल नाव आहे माझे, ते मराठी कसे बोलणार?” असा प्रश्न चर्चिलला पडतो.

ट्रेलरमधील दुसऱ्या एका दृश्यात हिटलर म्हणतो, “जपानने महत्वाचा शोध लावलेला आहे, मी स्वतः जपानला विमान चालवत जाणार आहे, तुम्ही येताय जपानला.” सहकाऱ्यांना विचारलेल्या या प्रश्नावर एक म्हणतो, “मला विमान लागते.” दुसरा म्हणतो, “माझे धडे बसतात.”तिसऱ्या एका प्रसंगात हिटलरचे पिस्तुल मिळाल्याचा संवाद आहे. “हिटलर मेला असेल तर?,” एकाची शंका. तर दुसरे पात्र म्हणते, “तार पाठवली पाहिजे जर्मनीला, हिटलर सिरीयस स्टार्ट इमेडीएटली!” आणखी एका प्रसंगात नाटकाची रिहर्सल चालली आहे. “तिकडे हिटलर-चर्चिल जगाची भादरत आहेत. इथे तुम्ही या नाटकाची भादरत आहात.”

या चित्रपटाबद्दल बोलताना निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे एक लाफ्टर राईड आहे. प्रशांत दामले यात हिटलर करत असल्याने चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे.”

मोकाशी म्हणाले, कलाकारांची आणि इतर तंत्रज्ञांची उत्तम साथ मिळाल्याने चित्रपटाची भट्टी चांगलीच जमून आली आहे. आजच्या ट्रेलरनंतर प्रेक्षक चातकासारखी चित्रपटाची वाट पाहतील याची मला खात्री आहे.”

चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे श्री भरत शितोळे म्हणाले, “चित्रपटाच्या घोषणेपासूनच आम्हाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट सर्वच अंगांनी उत्तम जुळून आला आहे रसिकांना तो नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news