MS Dhoni ने सलमान खानसोबत साजरा केला वाढदिवस, पत्नी साक्षीने केले चरणस्पर्श (Video)

MS Dhoni Birthday
महेंद्रसिंग धोनीने त्याचा वाढदिवस बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत साजरा केला. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आज (7 जुलै) 43 वर्षांचा झाला. या खास प्रसंगी स्टार्सपासून चाहत्यांपर्यंत सगळेच त्याला शुभेच्छा देत आहेत. माहीने त्याचा वाढदिवस बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत साजरा केला. यावेळी त्याची पत्नी साक्षीही उपस्थित होती. या अद्भुत क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. धोनी शनिवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ‘संगीत सेरेमनी’मध्ये पोहोचला होता. या सोहळ्यानंतरच त्यांनी हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला.

सोशल मीडियावर थालाच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा पूर आला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘आमच्या सलमान भाईसोबत केक कापताना धोनी... एकाच फ्रेममध्ये दोन दिग्गज... व्वा किती मोठा क्षण आहे.’ आणखी एक युजर म्हणतो, ‘मला माहित आहे की धोनी मुंबईत आहे, त्यामुळे सलमान त्याच्या वाढदिवसाला उपस्थित आहे. खरं तर दोघांमध्ये चांगले बाँडिंग आहे.’

बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही सोशल मीडियावर धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाचा फोटो शेअर केल्यानंतर त्याने म्हटलंय की, ‘हॅपी बर्थडे कॅप्टन साहेब...’

शनिवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा ‘संगीत सेरेमनी’ कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सलमान खानने त्याच्या किक चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर डान्स केला. यादरम्यान अनंत अंबानी, रणवीर सिंग, हार्दिक पंड्या आणि एमएस धोनी हेदेखील थिरकले. या पाच जणांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news