‘जुबान’नंतर मोझेझ सिंग-गुनीत मोंगा करणार “यो यो हनी सिंग : फेमस” खास प्रोजेक्ट

Mozez Singh - guneet monga
Mozez Singh - guneet monga
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे की, जेव्हा जेव्हा दोन पॉवरपॅक चित्रपट निर्मात्यांनी एकत्र काम केले तेव्हा त्यांनी रुपेरी पडद्यावर जादू निर्माण केली आहे. फरहान अख्तर-झोया अख्तर, करण जोहर-अयान मुखर्जी, सिद्धार्थ आनंद-आदित्य चोप्रा, एकता कपूर-रिया कपूर आणि इतर अनेक जोड्यांनी आजवर एकत्र काम करून जादू निर्माण केली आहे.

या सगळ्या जोड्यांनी आजपर्यंत अनेक कल्ट क्लासिक चित्रपट बनवले आहेत. आता मोजेझ सिंग आणि गुनीत मोंगा ही जोडी एकत्र काम करणार असल्याचं कळतंय. मोजेझ सिंग आणि गुनीत मोंगा हे 'जुबान' नंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. "यो यो हनी सिंग : फेमस" हा नवा प्रोजेक्ट् हे दोघे सोबत करणार आहेत.

मोझेझने याच दिग्दर्शन केले आहे आणि गुनीतने आगामी आणि बहुप्रतिक्षित डॉक्युमेंटरी चित्रपटाची निर्मिती केली आहे जी रॅपर यो यो हनी सिंगच्या जीवनातील एक आकर्षक झलक देणार असल्याचं वचन देते. मोझेज त्याचा कथाकथनासाठी आणि दूरदृष्टी कथनांसाठी ओळखला जातो. गुनीत मोंगा यांनी 'द लंचबॉक्स', 'मसान' आणि ऑस्कर-विजेता डॉक्युमेंटरी 'द एलिफंट व्हिस्परर्स' सारख्या प्रकल्पांसह सगळ्यांची मने जिंकली आहेत.

याबद्दल बोलताना मोझेझ म्हणतो, "गुनीतसोबत सहयोग करणे नेहमीच कमालीचं असत. तिचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून निर्माण होणारी जादू ही कायम बघण्याजोगे असते आणि आता आम्ही सोबत हा प्रोजेक्ट करतोय याचा आनंद आहे." डायनॅमिक जोडीने या अफलातून प्रोजेक्ट्ची सुरुवात केली असून त्यांच्या सहयोगी प्रकल्पाची सगळेच वाट बघत आहेत. 'यो यो हनी सिंग: फेमस'ची रिलीज डेट अजून जाहीर व्हायची असून अनेक चाहते हा प्रोजेक्ट OTT वर येण्याची वाट पाहत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news