पुढारी ऑनलाईन डेस्क : बाबा महाकालच्या दर्शनाला बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय पोहोचली. शनिवारी, बाबा महाकालच्या भक्तीत तल्लीन अभिनेत्री मोनी रॉयने महाकाल आरतीमध्ये सहभाग दर्शवला. शनिवारी भस्म आरतीमध्ये तिने सहपरिवार दर्शन करण्यासाठी श्री महाकालेश्वर मंदिर पोहोचली. तिच्यासोबत तिचे कुटुंबीय बाबा महाकालच्या भक्तीत लीन झाले.
साध्या कपड्यांमध्ये मौनीने आरती केली. भस्म आरती नंतर त्यांना प्रसाद देऊन अभिनेत्री आणि संपूर्ण परिवाराचा सन्मान देखील केला. तिने आपला अनुभव देखील सांगितला. ती म्हणाली, मनाची ईच्छा पूर्ण झाली. बाबाने अखेर बोलावलं. मंदिर समितीची खूप चांगली व्यवस्था आहे. आयुष्यात हे स्मरणीय क्षण कधी विसरणार नाही.