Marathi Movie Morya : ‘मोऱ्या’ मराठीसह ‘या’ भाषांमध्ये प्रदर्शित होणार

morya movie
morya movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. (Marathi Movie Morya) यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा मोऱ्या हा अत्यंत वेगळा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. सेन्सॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तमाम रसिकांमध्ये मोऱ्या बद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. (Marathi Movie Morya)

एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय तंतोतंत सफाई कर्मचाऱ्यांचं आयुष्य उभं करतं. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे.

चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची साथ लाभली आहे.

'टॉर्टुगा मोशन पिक्चर्स'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक – संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. संगीतकार-अमोघ इनामदार, गायक अवधूत गुप्ते तर डीओपी आकाश काकडे आहेत. सहाय्यक दिग्दर्शन श्रेयस गौतम, करण मोरे यांचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news