सस्पेन्स, थ्रील, ॲक्शनचा तडका – 'मिशन ग्रे हाऊस' या दिवशी होणार रिलीज

'मिशन ग्रे हाऊस' टीझर पाहिला का? यादिवशी होणार रिलीज
सस्पेन्स, थ्रील, ॲक्शनचा तडका – 'मिशन ग्रे हाऊस' या दिवशी होणार रिलीज
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'मिशन ग्रे हाऊस' या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. १७ जानेवारी, २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सस्पेन्स, थ्रील आणि ॲक्शनने भरपूर हा चित्रपट आहे.

टीझरच्या सुरुवातीला पांढऱ्या टी-शर्टमध्ये एक मध्यमवयीन माणूस एका अंधाऱ्या बंगल्यात भीतीने भरलेला दिसतो. अचानक घराच्या दारात डोक्यापासून पायापर्यंत झाकलेला गूढ व्यक्ती भिंग घेऊन उभा राहतो. काही क्षणांतच या व्यक्तीचा खून होतो, आणि गूढतेची कथा उलगडण्यास सुरुवात होते.

यानंतर, कबीर राठोडची दमदार एंट्री होते. पोलिसांच्या गणवेशात मोटरसायकलवरून आलेला कबीर गुन्हेगारांशी लढताना दिसतो. ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांच्या हत्येचा सीन, रहस्यमय खुनी हातात रक्तमाखलेला चाकू घेऊन उभा असलेला क्षण, आणि अनुभवी कलाकार किरण कुमार व राजेश शर्मा यांची चिंता या सगळ्यामुळे टीझर रोमांचक बनतो. टीझरच्या शेवटी कबीर आणि मिस्ट्री मॅनमधील तीव्र संघर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

दिग्दर्शक नौशाद सिद्दीकी म्हणतात, "‘मिशन ग्रे हाऊस’ हा चित्रपट एक अनोखी कथा घेऊन येत आहे. या चित्रपटात सस्पेन्स, थ्रिल, ॲक्शन आणि ड्रामाचा उत्तम संगम आहे. अबीर खान या तरुण अभिनेत्यासाठी ही एक मोठी संधी आहे, तर अनुभवी कलाकारांच्या सहयोगामुळे कथा अधिक इम्प्रेसिव झाली आहे."

मिशन ग्रे हाऊसच्या माध्यमातून युवा अभिनेता अबीर खान या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच पूजा शर्मा देखील टेलीव्हिजन नंतर बॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे. त्याच्यासोबत चित्रपटात दिग्गज कलाकार रझा मुराद, किरण कुमार, राजेश शर्मा, आणि निखत खान महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

संगीत एच. रॉय यांनी दिले आहे. सुखविंदर आणि शान यांनी गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. चित्रपटाची कथा झेबा के. यांनी लिहिली आहे. लोणावळा आणि पुणे या आकर्षक ठिकाणी चित्रपटाची शूटिंग करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news