Mission Grey House | सस्पेन्स, थ्रिलर 'मिशन ग्रे हाऊस'चा सस्पेन्स, ॲक्शनपॅक्ड ट्रेलर लॉन्च

'मिशन ग्रे हाऊस' यादिवशी होणार रिलीज
Mission Grey House
'मिशन ग्रे हाऊस' यादिवशी होणार रिलीजInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमध्ये सस्पेन्स आणि थ्रिलर जॉनरचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांना पाहायला आवडतात. नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि त्यासोबतच या वर्षातील पहिल्या म्युझिकल थ्रिलर चित्रपट 'मिशन ग्रे हाऊस'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी ‘मिशन ग्रे हाऊस’ चित्रपटात मुख्य भूमिका करणारे युवा अभिनेता अबीर खान, अभिनेत्री पूजा शर्मा आणि प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची बहीण अभिनेत्री निखत खान यांनी आपली उपस्थिती नोंदवली. अबीर खान ‘मिशन ग्रे हाऊस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या ट्रेलर ची सुरुवात अंधाऱ्या रात्री निर्जन एरियामध्ये "हे रहस्यमय राखाडी घर आहे" अशा आवाजामध्ये सुरु होत आहे. २ मिनिट १३ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये पांढरा टी-शर्ट घातलेला एक मध्यमवयीन माणूस दिसतो. त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर भीती दिसत होती. अचानक घराच्या दारात एक गूढ माणूस दिसतो जो डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे झाकलेला असतो आणि त्याच्या हातात एक भिंग दिसते.

पार्श्वभूमीत भितीदायक संगीत ऐकू येत आहे. त्या नंतर गूढ माणसाने त्या व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचा गळा चिरताना दिसत आहे. पुढच्या सीनमध्ये अभिनेता राजेश शर्मा अभिनेता किरण कुमारशी फोनवर ग्रे हाऊसबद्दल बोलतांना दिसत आहे. यानंतर, कबीर राठोड म्हणजेच अबीर खान, मोटारसायकलवर पोलिसांच्या गणवेशात, कारमध्ये बसलेल्या गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांशी लढताना दिसत आहे. पुढच्याच सीनमध्ये रझा मुरादची स्विमिंग पूलजवळ क्रूरपणे हत्या होताना दिसत आहे. यशपाल शर्माने कबीर कबीर राठोर ला ग्रे हाऊसमध्ये होणाऱ्या खुनाचा शोध लावण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर अबीर खान तपासात गुंततो, या दरम्यानच्या संघर्षांमध्ये होणारे चढ-उतार, मारामारीचे दृश्य आणि खून, तसेच वेगाने बदलणारी परिस्थिती ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

ट्रेलर पाहून अंदाज बांधता येतो की, 'मिशन ग्रे हाऊस' चित्रपटात जबरदस्त सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शन पाहायला मिळणार आहे. आणि हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ग्रे हाऊसमध्ये होणाऱ्या हत्यांमागील गूढ उलगडणार आहे. नौशाद सिद्दीकी द्वारा दिग्दर्शित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत चित्रपटाची निर्मिती रफत फिल्म्स एंटरटेनमेंट ने केली आहे. चित्रपटाचे संगीत एच. रॉय यांनी दिले आहे तर कथा ज़ेबा के. यांनी लिहिले आहे.

या चित्रपटात तरुण पोलीस अधिकारी कबीर राठोरची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अबीर खान त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये खूप उत्सुक दिसत होता. याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, "चित्रपटाच्या कथेत खूप गूढ आहे. दमदार ॲक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटातून आम्ही प्रेक्षकांसमोर मनोरंजनाची एक नवीन संकल्पना मांडणार आहोत. या चित्रपटातील रोमांचक कथा पडद्यावर सादर करण्यासाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

सुपरस्टार आमिर खानची बहीण ज्येष्ठ अभिनेत्री निखत खान ट्रेलर लाँचच्या वेळी उपस्थित होत्या. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबद्दल सांगताना म्हणाल्या "सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बनवणे सोपे काम नाही. प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटात गूढ रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी क्लायमेक्स पर्यंत वाट पाहावी लागणार, प्रेषकआपली सीट सोडणार नाहीत याची खात्री आहे.

अबीर खानसोबत, रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि रफत फिल्म्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित 'मिशन ग्रे हाऊस' या चित्रपटातून पूजा शर्मा देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ॲक्शन आणि थ्रिलर असण्यासोबतच हा एक संगीतमय चित्रपट आहे ज्यामध्ये सुखविंदर आणि शान सारख्या मोठ्या गायकांनी गाणी गायिली आहेत. लोणावळा आणि पुणे या सुंदर लोकेशन्सवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे हा चित्रपट याच महिन्यात १७ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news